Maharashtra School Online Attendance : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रकल्प संचालकांनी आदेश दिले आहेत. {Maharashtra School Online attendance of students } राज्यातील तमाम शालेय विद्यार्थी (Online Attendance System) आणि शिक्षकांसाठी महत्वाची बातमी आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांतील 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती (Online attendance of students) ऑनलाईन पद्धतीने नोंदवली जाणार आहे. शिक्षकांना यापुढे मोबाईलवर विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविणे अनिवार्य आहे. Attendance of Class 1st to 10th students in local bodies, private aided and partially aided schools in the state will now be registered online. Attendance of students will be recorded through Swift Chat app. https://mahitivibhag.com/maharashtra-school-online-attendance/
Maharashtra School Online attendance of students
स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित आणि अशंत: अनुदानित शाळांतील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाईन घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. दि. 1 डिसेंबरपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. स्विप्ट चॅट या अॅपद्वारे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवली जाणार आहे. ऑनलाईन हजेरीमुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीतील बोगसगिरीला आळा बसणार आहे.
also Read this : daily Government job update click here
शाळांतील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाईन
उपस्थिती नोंदविताना शिक्षकांनी शाळेचा यू-डायस क्रमांक आणि स्वतःच्या शालार्थ क्रमांकाचा वापर करायचा आहे. शालार्थ क्रमांकासाठी वापरलेलाच मोबाईल क्रमांक शिक्षकांना वापरावा लागणार आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन नोंदविण्याबाबत स्वतंत्रपणे सूचना दिल्या जातील. दोन सत्रांत भरणाऱ्या शाळांसाठी सकाळी 7 ते दुपारी 12, तर शाळांसाठी 10 ते 5 या वेळेत विद्यार्थी उपस्थितीची नोंद अटेंडन्स बॉटवर करावी, अशा सूचना दिल्या आहेत.
also Read this : Shivaji University Result : New Link Updated | शिवाजी विद्यापीठ निकाल पाहण्यासाठी नवीन लिंक उपलब्ध
एखाद्या शाळेतील एखाद्या वर्गाची तुकडी विनाअनुदानित असल्यास त्या वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती त्याच शाळेतील अनुदानित शिक्षकांचा शालार्थ क्रमांक वापरून (Online Attendance System) नोंदवावी, चॅटबॉटद्वारे उपस्थिती नोंदविताना शालेय क्रमांकासाठी अडचणी आल्यास इतर शिक्षकांचा शालेय क्रमांक वापरून ऑनलाइन उपस्थिती नोंदवायची आहे. विद्यार्थी उपस्थिती नोंदविताना अडचणी येत असल्यास शालेय संकेतस्थळ, सरल संकेतस्थळ, यू-डायस या सर्व संकेतस्थळांतील माहिती अद्ययावत करावी. सर्व संकेतस्थळांवरील अडचणी दूर होतील, असे शिक्षण परिषदेने स्पष्ट केले आहे.
Maharashtra School Online attendance Online Attendance : अॅपचा होणार वापर
पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वर्गशिक्षकांनी ‘SwiftChat’ अॅप डाऊनलोड करून त्यामधील अटेंडन्स बॉटद्वारे ऑनलाइन नोंदविणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, अनुदानित शाळेतील शालार्थ क्रमांक उपलब्ध शिक्षकांना अटेंडन्स बॉटद्वारे उपस्थिती नोंदविता येईल.
अधिक माहितीसाठी : https://mahitivibhag.com/
also Read this : PM Kisan Yojana 15th Installment latest Update | PM किसान योजना 15 वा हप्ता २००० रुपये हस्तांतरित