ZP Sangli Agriculture Scheme : कृषी विभाग जिल्हा परीषद सांगली मार्फत स्विय निधी योजना अंतर्गत आयुधे/ औजारे लाभ . सन २०२२-२३ मध्ये शेतकऱ्यांसाठीच्या योजना ट्रॅक्टर, पावर टिलर, कडबाकुट्टी मशिन ई. औजारे अनुदानासाठी अर्ज सुरु . ZP Sangli Agriculture Scheme , कृषी विभाग जिल्हा परीषद स्विय निधी योजना , Zilla Parishad Sangli .
सदर अर्जामध्ये मागणी केलेल्या आयुधे / औजारे नाव, आयुधे/औजारे कोटेशन क्र. व दिनांक, बँकेचे पूर्ण नाव व शाखा, बँकेचा खाते नंबर (आधारकार्डशी जोडलेला असावा), बँकेचा आय एफ एस सी (IFSC) नंबर, आधार कार्ड क्रमांक, इत्यादी तपशील योग्यरीत्या लिहून दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र, आणि जात प्रमाणपत्र (मागासवर्गीय अनुसूचित जाती/जमाती ) असल्यास जोडावे.
कृषी विभाग जिल्हा परीषद सांगली मार्फत शेतकऱ्यांसाठीच्या योजना ट्रॅक्टर, पावर टिलर, कडबाकुट्टी मशिन ई. औजारे अनुदानासाठी अर्ज सुरु
ZP Sangli Agriculture Scheme
◆ योजने बाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे :
१) कडबाकुट्टी मशिन (chaffcutter) २ एच.पी. इलेक्ट्रीक मोटरसह (ISI mark) योजना
- अनुदान मर्यादा:
रु.९,०००/- किंवा किमतीच्या ५०% यापैकी जे कमी असेल ते.
२) पावर टिलर (Power Tiller) ८ एच.पी. पेक्षा जास्त क्षमतेचा रोटरीसह योजना
- अनुदान मर्यादा:
रु.५०,०००/- किंवा किमतीच्या ४०% यापैकी जे कमी असेल ते
३) ट्रॅक्टर (Tractor) ०८ ते ७० PTOHP योजना
- अनुदान मर्यादा:
रु.९०,०००/- प्रति लाभार्थी
◆ अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :
- सातबारा खाते उतारा
- आयुधे/औजारे कोटेशन
- आधार कार्ड स्वयंसाक्षांकित प्रत
- बँक पासबुक झेरॉक्स प्रत ( IFSC कोड सहित )
- हयातीचे स्वयंघोषणापत्र
- लहान कुटुंबाचे स्वयंघोषणापत्र
- दिव्याग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र झेरॉक्स प्रत (असल्यास)
- मागासवर्गीय अनुसूचित जाती/जमाती या प्रवर्गातील असल्यास त्याबाबत प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दिलेल्या वैध जात प्रमाणपत्राची प्रत
- यापूर्वी सांगली जि.प. कडील & या वैयक्तिक योजनेचा लाभ न घेतलेचे हमीपत्र.
◆ लाभार्थी निवड निकष :
- यापूर्वी जि.प.च्या कडबाकुट्टी मशिन/पावर टिलर/ट्रॅक्टर या वैयक्तिक योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- स्वतः चे नावे ७/१२ व खाते उतारा असावा,
- महिला लाभार्थी व अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य राहील.
- दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल.
- कडबाकुट्टी मशिन करीता अर्जदार शेतकऱ्याकडे पशुधन असलेबाबतचा पशुवैद्यकीय यंत्रणेचा दाखला
◆ अर्जासोबत सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे :
- विहीत नमुन्यातील मागणी अर्ज
- आजारे / आयुधे यापूर्वी घेतले नसलेबाबत तसेच DBT साठी कॅशलेस पध्दतीने खरेदीबाबतचे हमीपत्र
- ७/१२ व खाते उतारा (८ अ)
- आधारकार्ड झेरॉक्स
- आधारकार्डशी संलग्न बैंक पासबुक झेरॉक्स
- २ पेक्षा जास्त अपत्य नसलेवायतचे स्वंय घोषणापत्र
- दिव्यांग असलेस तसा दाखला
◆ कृषी विभाग जिल्हा परीषद स्विय निधी योजना सूचना :
- योजनेसाठीचा अर्जाचा नमुना गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे उपलब्ध असून तालुकास्तरावरच मागणी अर्ज आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण करून पं.स.कडे सादर करावा.
- लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थीने ज्या घटकासाठी अर्ज करावयाचा आहे. त्या घटकाचा जिल्हा परिषदेच्या अन्य योजनेतून लाभ घेतलेला नसावा.
- लाभार्थी निवड सर्व प्राप्त अर्ज संकलित केलेनंतर लॉटरी पध्दतीने करणेत येईल.
- मंजूर लाभार्थीने पूर्व समंतीनंतर वरील वस्तूंची खरेदी कॅशलेस पध्दतीने खुल्या बाजारपेठेतून करावयाची असून अनुदानाची रक्कम ऑनलाईन पध्दतीने त्यांचे बँक खातेवर वर्ग करणेत येईल.
- विहीत मानकांची तसेच शासकीय मान्यता प्राप्त संस्थेचा तपासणी अहवाल असणारी वस्तू / औजारे खरेदी करणे बंधनकारक राहील. अन्यथा अनुदानास अपात्र ठरविणेत येईल.
- गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे ३१/०८/२०२२ अखेर प्राप्त अर्जांचा विचार केला जाईल. या तारखेनंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
- कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषद मुख्यालयामध्ये लाभार्थीचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
◆ कृषी विभाग जिल्हा परिषद सांगली यांचेकडील स्वीय निधी योजनेतून आयुधे / औजारे लाभ मिळणेबाबत अर्ज नमुना डाउनलोड करण्यासाठी
- अर्ज नमुना : येथे क्लिक करा
सूचना : तपशीलवार जाहिरात वाचण्याची विनंती.
अधिकृत वेबसाईट : www.zpsangli.com
◆ अधिक माहितीसाठी संपर्क:
- जिल्हा परिषद सांगली अंर्गत पंचायत समिती मध्ये गट विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
________________________________________________________________________________