PM किसान eKYC करण्यास मुदतवाढ
PM Kisan Yojana Update : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी. या योजनेअंतर्गतचा लाभ सहजरित्या अदा करता यावा म्हणून केंद्र शासनाने लाभार्थ्यांना त्यांची ओळख पडताळणी (ई-केवायसी) पूर्ण करण्यासाठी 31 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
PM Kisan Yojana Update
ई-केवायसी पडताळणी
लाभार्थ्यास स्वतः पीएम किसान पोर्टलवर https://pmkisan.gov.in/ या लिंक आधारे किंवा सामायिक सुविधा केंद्रामार्फत ई-केवायसी पडताळणी करण्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या दोन्हीपैकी स्वत:च्या सोयीनुसार एका सुविधेच्या आधारे लाभार्थ्यास त्याची ई-केवायसी पडताळणी करता येणार आहे.
अंतिम दिनांक :
- 31 जुलै 2022
➡️ ई-केवायसी (eKYC) : Click Here ✅
पीएम किसान पोर्टलवरील लिंकद्वारे लाभार्थ्यास त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न केलेल्या मोबाईलवर येणाऱ्या ओटीपीच्या आधारे स्वत:ची ई – केवायसी पडताळणी करता येईल. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यासाठी सामायिक सुविधा केंद्राकडून रक्कम 15 रुपये प्रती लाभार्थी शुल्क आकारण्यात येईल.
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी ‘पीएम किसान’ अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयांना (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षांखालील अपत्ये) २ हजार रुपये प्रति हप्ता या प्रमाणे ३ हप्त्यांत ६००० रुपये प्रतिवर्षी लाभ बँक खात्यात थेट जमा करण्यात येत आहे. आज अखेर या योजनेअंतर्गत राज्यातील १ कोटी ९ लाख ४६ हजार लाभार्थ्यांना एकूण १८ हजार १५१ कोटी ७० लाख रुपये लाभ अदा करण्यात आलेला आहे.