Shivaji University Convocation form : Shivaji University’s 61st convocation is generally scheduled in December 2024. (Shivaji University Convocation online form) For this, eligible students who have passed the final examination of October 2023 and March 2024 session and earlier must apply online in the prescribed format to get the degree, diploma, certificate within the time limit shown below. Unishivaji Convocation 2024 , Shivaji University 61th Convocation Ceremony, Shivaji University Convocation registration .
Shivaji University Convocation form
शिवाजी विद्यापीठाच्या ६१ वा दीक्षांत समारंभ साधारणपणे डिसेंबर २०२४ मध्ये नियोजित आहे. याकरीता ऑक्टोबर २०२३ व मार्च २०२४ सत्रातील आणि यापूर्वीच्या अंतिम परीक्षेमध्ये उत्तीर्ण व पात्र विद्यार्थ्यानी पदवी, पदविका, प्रमाणपत्र मिळण्याकरिता विहित नमुन्यामध्ये ऑनलाईन (Online) अर्ज खाली दर्शविलेल्या मुदतीमध्ये करणे आवश्यक आहे.
Shivaji University Convocation Date and Fee details
शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाची तारीख आणि शुल्काचा तपशील इमेज खाली दर्शविला जाईल
Shivaji University Convocation registration
also Read this : Shivaji University Result : New Link Updated
Shivaji University Convocation online form
डिग्री सर्टिफिकेट मिळवण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यसाठी (Registration) :
Shivaji university Convocation Login
रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉगीन करून संपूर्ण फॉर्म भरण्यसाठी
Unishivaji Convocation 2024 Contact Number
ऑनलाईन अर्ज करताना काही अडचणी उदभवल्यास खालील दुरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधावा
ऑनलाईन अर्जाबाबतीत तांत्रिक अडचणीबाबत संपर्क क्रमांक –
- आय.टी.सेल ०२३१-२६०९३३५
- संगणक विभाग ०२३१-२६०९३७८
ऑनलाईन शुल्काबाबत उद्भवणाऱ्या अडचणीबाबत संपर्क क्रमांक –
- लेखा विभाग ०२३१-२६०९०७८
- दीक्षांत विभाग ०२३१-२६०९११३/०२३१-२६०९३०२.
also Read this : daily Government job update click here
Shivaji University Convocation Notification
- पदवी प्रमाणपत्र मागणीचा अर्ज www.unishivaji.ac.in/Web Apps (Regular Convocation) या संकेत स्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने भरावा लागेल. ऑनलाईन अर्ज भरताना प्रथम संकेतस्थळावरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात व आवश्यक ती माहिती सोबत ठेवावी.
- विद्यार्थ्यांनी यापूर्वी पदवी प्रमाणपत्र घेतले असेल तर पुनःश्च अर्ज करु नये. • ऑनलाईन अर्ज करताना आलेली माहिती बरोबर आहे की नाही याची खात्री करावी. जर विद्यार्थ्याच्या नावात/अन्य दुरुस्ती असल्यास प्रथम संबंधीत परीक्षा विभागाशी/संबंधित महाविदयालयातून / स्वायत्त महाविदयालयातुन ती दुरुस्ती करुन माहिती अपडेट करुनच पदवी प्रमाणपत्राकरीता संबंधित ऑप्शनमधून अर्ज भरावा. विदयाथ्यनि मराठीमधील आपले पुर्ण नाव व आईचे नाव बिनचूक नमुद करावे. Shivaji University 61th Convocation Ceremony
- प्रत्येक पदवी प्रमाणपत्र ऑनलाईन अर्जासाठी वेगळा ई मेल आयडी वापरावा. • सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत स्वतःच्या माहितीसाठी जपून ठेवावी. विदयार्थ्यानी अर्जाची प्रिंट विदयापीठात जमा करण्याची आवश्यकता नाही.
- सन २००२ पासून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यानी रेग्युलर ऑप्शन मधून फॉर्म भरण्यात यावा. तसेच २००२ पूर्वी उत्तीर्ण झालेल्या ज्या विदयार्थ्याचा फॉर्म रेग्युलर ऑप्शनमधून भरला जात नाही, त्या विदयार्थीनी फॉर्म भरण्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रांसहीत प्रत्यक्ष दीक्षांत विभागामध्ये संपर्क साधावा. (अंतीम वर्षाचे मार्कलिस्टची झेरॉक्स, स्वतःचा आयकार्ड साईज फोटोची एक प्रत व फोटोशी साम्य असलेले स्वतःचे आयडेटी प्रुफ झेरॉक्स, आईचे नावासंदर्भात आवश्यक कागदपत्रे उदा. आईचे आधारकार्ड) तसेच ज्या विदयार्थ्यांना विदयापीठात येणे शक्य नसेल त्या विदयार्थ्यानी दीक्षांत विभागाशी संपर्क साधावा.(फोन नं.०२३१-२६०९११३/२६०९३०२ व ईमेल [email protected]
- अर्ज ऑनलाईन भरताना जे विद्यार्थी २००६ पूर्वी उत्तीर्ण आहेत अथवा ज्या विद्यार्थ्याचे फोटो ऑनलाईन दिसत नाहीत त्यांनी स्वतःच्या फोटोची JPEG image (20 kb) अपलोड करुन अर्ज ऑनलाईन भरावा.
- अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी स्वतःचा ई-मेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक बिनचूक नमूद करणे आवश्यक आहे.
- दीक्षांत समारंभाची तपशिलवार माहिती विद्यापीठाच्या संकेत स्थळावर ठेवण्यात येईल तसेच विद्यार्थ्याना SMS व्दारे कळविण्यात येईल.
- दीक्षांत शुल्क ऑनलाईन भरत असताना एकदा पेमेंट झालेबाबतचा संदेश आलेनंतर पुन्हा किमान ६० मिनिटे पुनश्च पेमेंट करु नये. अन्यथा (Double Payment) होवू शकते. Shivaji University Convocation form 2024 last date
- वैद्यकीय शाखेच्या (Medical Faculty) विद्यार्थ्यांनी अर्जासोबत विद्यापीठाचे (Internship Complition Certificate of University) प्रत अपलोड करणे आवश्यक आहे.
- ज्या परीक्षांचा निकाल Viva-Voce, Dessertation नंतर जाहीर करण्यात येतात, त्या परीक्षांचे अंतिम गुणतक्ता अपलोड करणे आवश्यक आहे. (उदा. M.E./M. Tech/M.Text/M.Arch./M.Pharmacy/M.Phil/Ph.D etc.)
- M.Phil/Ph.D उत्तीर्ण विदयार्थ्यानी ऑनलाईन अर्जामध्ये Viva-Voce Date बिनचूक नमूद करावी, पत्राची तारीख नमुद करु नये, व ऑनलाईन अर्जासोबत Ph.D Declaration letter अपलोड करावे.
- श्रेणीसुधारणा परीक्षेस बसून ज्यांच्या निकालात श्रेणीसुधारणाझालेली आहे अशा विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्र मागणी अर्जासोबत पूर्वीचे मूळ पदवी प्रमाणपत्र विद्यापीठास परत करणे आवश्यक आहे अशा विदयार्थ्यानी आवश्यक कागदपत्रांसह दीक्षांत विभागास समक्ष संपर्क साधावा. फक्त गुणांमध्ये बदल झाला असेल व श्रेणी सुधारणा झाली नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करु नये. अशा विदयार्थ्यानी पुर्वीचे पदवी प्रमाणपत्र घेतले नसेल तर त्यांनी पुर्वीच्याच परीक्षेनुसार पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करावा.
- अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी आपला पूर्ण पत्ता, पिनकोडसहीत बिनचूक लिहावा /ऑनलाईन भरावा. चुकीचा पत्ता दिल्यास पत्रव्यवहार/पदवी प्रमाणपत्र पोहचू शकले नाही तर विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहणार नाही.
- दूरशिक्षणव्दारे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व बंद झालेल्या महाविदयालयातील विद्यार्थ्यांना, तसेच विद्यापीठ कार्यक्षेत्राबाहेरील (उदा. सोलापूर जिल्हा) विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभ संपन्न झालेनंतर रजिस्टर पोस्टाने पदवी प्रमाणपत्र पाठविण्यात येईल.
- दीक्षांत समारंभापूर्वी पदवी प्रमाणपत्र पात्र विद्यार्थ्यांची यादी व इतर अनुषंगिक सूचना विद्यापीठाच्या वेबसाईटवर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल.
- पदवी प्रमाणपत्राबाबत तक्रार किंवा दुरुस्ती असल्यास, विदयार्थ्याने त्याच्या Login मधील Grievance मध्ये ती नोंदवावी.
- अपु-या अर्जाची दखल घेतली जाणार नाही आणि त्याबाबत पत्रव्यवहार करण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी.
- ज्या विदयार्थ्यांना दीक्षांत समारंभानंतर विहित सर्व प्रक्रीया पुर्ण केलेनंतरही पदवीप्रमाणपत्र प्राप्त झाले नसल्यास, त्या विदयार्थ्यानी, दीक्षांत विभागास समारंभानंतर तीन महिन्यापर्यंतच संपर्क साधावा. त्यानंतर कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.
- विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करताना काळजीपूर्वक In Person/In Absentia पैकी ऑप्शन निवडावा. त्यामध्ये नंतर कोणताही बदल केला जाणार नाही.
हे वाचा 👉विविध सरकारी योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
हे वाचा 👉 सरकारी नौकरीची दररोज नवीन माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा