८ सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस : International Literacy Day
कधीपासून साजरा होत आहे साक्षरता दिवस?
आंतरराष्ट्रीय पातळीवर १९६६ पासून साक्षरता दिन साजरा होत आहे. याआधी १९६५ मध्ये ८ ते १९ सप्टेंबर दरम्यान इराणची राजधानी तेहरान येथे जगभरातील देशांच्या शिक्षणमंत्र्यांची एक बैठक झाली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. यानंतर युनेस्कोने दरवर्षी ८ सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिन (International Literacy Day) साजरा केला जाईल, असे जाहीर केले. या घोषणेनंतर दरवर्षी ८ सप्टेंबर रोजी जागतिक साक्षरता दिन (International Literacy Day) साजरा केला जात आहे.
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस का साजरा केला जातो?
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा करण्याचे मुख्य उद्दीष्ट वैयक्तिक, सामुदायिक आणि सामाजिकदृष्ट्या साक्षरतेचे महत्त्व लोकांना पटवून देणे व या दिवसाद्वारे, जगभरातील लोकांना शिक्षणाबद्दल जणजागरूक केले जाते, जेणेकरून ते त्यांचे भविष्य चांगले बनवू शकतील. तसेच मानवी विकास आणि समाजासाठी त्यांचे हक्क जाणून घेण्यासाठी आणि त्यांना साक्षरतेकडे वळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा केला जातो. भारत किंवा देश-जगातील दारिद्र्य निर्मूलन करणे, बालमृत्यू कमी करणे, लोकसंख्या वाढ नियंत्रित करणे, लिंग समानता साध्य करणे इत्यादी वाढणे खूप महत्वाचे आहे. निरंतर शिक्षण प्राप्त करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि कुटुंब, समाज आणि देशाप्रती त्यांची जबाबदारी समजून घेण्यासाठी साक्षरता दिवस साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय समुदायासाठी प्रौढ शिक्षण आणि साक्षरतेच्या दराकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस खास साजरा केला जातो.
काय आहे साक्षरता दिनाची संकल्पना?
साक्षरता दिनाचा उद्देश नागरिकांना साक्षर होण्यासाठी प्रेरित करणे हा आहे. कोरोना संकटामुळे सध्या शिक्षण संस्था बंद आहेत पण ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. पण समाजातील एक वर्ग असा आहे ज्याला हे ऑनलाइन शिक्षण आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. यामुळेच यंदाच्या जागतिक साक्षरता दिनाची संकल्पना ‘मानव केंद्रीत पुनर्प्राप्तीसाठी साक्षरता : डिजिटल विभाजन कमी करणे’ ही आहे. ज्यांना आर्थिक अडचणीमुळे ऑनलाइन शिक्षण कठीण आहे, अशांना सहकार्य करणे आणि त्यांच्या अडचणी सोडवणे हा यंदाच्या साक्षरता दिनाचा मुख्य उद्देश आहे.
भारताची साक्षरता
भारताचा साक्षरता दर जागतिक साक्षरतेच्या दरापेक्षा 84% कमी आहे. 2011 मध्ये भारताचा एकूण साक्षरता दर 74.4% आहे. 1947 मध्ये देशाचा साक्षरता दर फक्त 18% होता. त्याच वेळी, केरळ हे देशातील सर्वाधिक साक्षरतेचे राज्य आहे जेथे 93% लोकसंख्या साक्षर आहे. यात पुरुष साक्षरता 96% आहे आणि महिला साक्षरता दर 92% आहे. सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य बिहार आहे, जिथे 63.82% लोकसंख्या साक्षर आहे. उत्तर प्रदेश पाच कमी साक्षर राज्यांच्या श्रेणीत आहे.