Breaking News

धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम | राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय

राज्यातील धान उत्पादकांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यासाठी १ हजार कोटी रुपये इतक्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याचा लाभ अंदाजे ५ लाख शेतकऱ्यांना होईल.

धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम

हे वाचा 👉 राज्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना सुरू | असा करा ऑनलाईन अर्ज | Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana Maharashtra

धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम

या संदर्भात नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देखील मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती. २०२२-२३ या खरीप पणन हंगामात केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमी भावाव्यतिरिक्त नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान लागवडीखालील जमिनीनुसार प्रती हेक्टरी १५ हजार रुपये या प्रमाणे प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येईल. ही रक्कम २ हेक्टर मर्यादेत देण्यात येईल.

हे वाचा 👉 आता Whatsapp वर मिळणार बँक अकाऊंटची सर्व माहिती | SBIनं ग्राहकांसाठी सुरू केली खास सुविधा | पहा संपूर्ण माहिती | SBI WhatsApp Banking Service

मागील म्हणजे २०२१-२२ खरीप हंगामात १ कोटी ३३ लाख ७९ हजार ८९२ क्विंटल धान खरेदी झाली होती. पण या हंगामात धानाकरिता प्रोत्साहनपर रक्कम जाहीर करण्यात आली नव्हती. या पूर्वीच्या खरीप हंगामामध्ये धान उत्पादकांना प्रती क्विंटल ७०० रुपये अशी रक्कम प्रोत्साहनपर म्हणून देण्यात आली आहे. मात्र ही रक्कम प्रती क्विंटल देण्यात येत असल्यामुळे काही अडचणी येत होत्या. ज्या शेतकऱ्यांकडे ५० क्विंटलपेक्षा कमी धान उत्पादन आहे अशांच्या नावे ५० क्विंटल मर्यादेपर्यंत जास्तीची धान खरेदी करण्याचे प्रसंग घडले. तसेच शेजारील राज्याचे धान महाराष्ट्रात विक्री करिता आणल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या.

हे वाचा 👉 शेतकऱ्यांना 15 लाख रुपये थेट बँक खात्यात, काय आहे योजना आणि कसा अर्ज करावा | पहा संपूर्ण माहिती | PM Kisan FPO Yojana

यंदा २०२२-२३ योजनेकरिता सुमारे ५ लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून एकूण ६ लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर धान उत्पादन झाले आहे.

Paddy farmers will get Rs 15000 per hectare

हे वाचा 👉 सरकारी नौकरीची दररोज नवीन माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा   

हे वाचा 👉 नवीन मतदार ओळखपत्र आधार लिंक असलेले डाउनलोड सुरू | मोबाइल वर 2 मिनिटात डाउनलोड करा | New Voter ID Card Download

Check Also

aharashtra Home Guards now be given 180 days duty

महाराष्ट्र होमगार्डना आता १८० दिवस काम- सहा महिने सलग काम तसेच दर तीन वर्षांनी नोंदणीची अटही रद्द | Maharashtra Home Guard

Maharashtra Home Guard : राज्य गृहरक्षक दलासंबंधित राज्यातील होमगार्ड (Home Guard) सैनिकांना आता १८० दिवस काम दिले जाईल.

Shivaji University Result

Shivaji University Result : New Link Updated | शिवाजी विद्यापीठ निकाल पाहण्यासाठी नवीन लिंक उपलब्ध

Shivaji University online Result : New Link Updated | FY, SY,TY - BA ,BSc, BCom, BBA, BCA, परीक्षेचे शिवाजी विद्यापीठ निकाल पाहण्यासाठी नवीन लिंक उपलब्ध. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर (SUK) .