WE ज्ञान शिष्यवृत्ती “WEnyan scholarship” रसायनशास्त्र आणि संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना दिली जाणारी संशोधन शिष्यवृत्ती असुन या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून रसायनशास्त्र आणि संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मार्गदर्शन सुद्धा दिले जाते. WEnyan शिष्यवृत्तीच्या {WEnyan scholarship} माध्यमातून महाराष्ट्रातील कमी उत्पन्न गटातील पात्र महिला उमेदवारांना फंडिंग सपोर्ट, मार्गदर्शन आणि उद्योजक कौशल्य विकास अशा सुविधा पुणे नॉलेज क्लस्टरकडून उपलब्ध करून दिल्या जातात. शिष्यवृत्ती BASF केमिकल्स इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीने हि शिष्यवृत्ती स्पॉन्सर केली असून पुणे नॉलेज क्लस्टरकडून (Pune Knowledge Cluster) प्रधान वैज्ञानिक सल्लागार (GoI) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केली आहे. WEnyan scholarship in marathi information https://mahitivibhag.com/wenyan-scholarship/
WEnyan scholarship
WEnyan शिष्यवृत्तीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कमी उत्पन्न गटातील पात्र महिला उमेदवारांना फंडिंग सपोर्ट, मार्गदर्शन आणि उद्योजक कौशल्य विकास अशा सुविधा पुणे नॉलेज क्लस्टरकडून उपलब्ध करून दिल्या जातात. ही शिष्यवृत्ती Applied Natural Sciences, Specialty Chemicals, Agro-Chemicals, New Materials, Sustainability यासारख्या संबंधित क्षेत्रातील मुलींना दिली जाते.
WEnyan scholarship in marathi
WE ज्ञान शिष्यवृत्ती रक्कम व फायदे :
- B.Sc. / B.Tech./ B.Pharm अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या मुलींसाठी – 3 महिन्यांसाठी 10,000 प्रति महिना शिष्यवृत्ती
- M.Sc / एम.टेक. / M.Pharm च्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी. – 6 महिन्यांसाठी 15,000 प्रति महिना शिष्यवृत्ती
- सुरुवातीच्या टप्प्यातील मुली उद्योजकांसाठी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी B.Sc. / B.Tech. / B.Pharm किंवा M.Sc./ M.Tech. / M.Pharm यापैकी कोणतीही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेल्या आणि उद्योजकतेमध्ये करियर करणाऱ्या विद्यार्थीनींकरिता – प्रोटोटाइप डेव्हलपमेंटसाठी 6.5 लाख आणि 6 महिन्यांसाठी 15,000 प्रति महिना शिष्यवृत्ती
- या क्षेत्रातील अनुभवी महिलांसोबत संवादसत्रात सहभागी होण्याची संधी.
- रसायनशास्त्र क्षेत्रातील नेतृत्व करणाऱ्या महिलांकडुन मार्गदर्शन मिळवण्याची संधी.
- भारतातील विज्ञान आधारित स्टार्टअपना भेट देण्याची संधी
- सदर क्षेत्रातील उदयोग व संशोधन प्रयोगशाळांना भेट देण्याची संधी
- रसायनशास्त्र विषयातील उदयोग , शैक्षणिक, नव- उदयोग क्षेत्रातील महिला तज्ञांकडून
- त्यांच्या कामगिरीबदद्ल अनुभव ऐकण्याची संधी
- पुणे नॉलेज क्लस्टरच्या वूमन इन केमिस्ट्री & सस्टेनेबिलिटी या व्याख्यानमालेच्या माध्यमातून रसायनशास्त्रातील नवीन संधींबद्दल माहिती मिळवण्याची संधी.
WEnyan scholarship – पात्र अभ्यासक्रम (Eligible Course) :
- अभ्यासक्रम स्तर: अंडरग्रेजुएट आणि पोस्ट ग्रॅज्युएशन (Undergraduate & Post Graduation)
- अभ्यासक्रमाचे नाव: B.Sc./ B.Tech./ B.Pharm./ M.Sc./ M.Tech./ M.Pharm
पात्रता निकष ( Eligibility Criteria ) :
खालील पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थिनी WEnyan शिष्यवृत्तीकरिता अर्जासाठी पात्र आहेत.
- 1) महाराष्ट्रातील उपेक्षित समाजातील / कमी उत्पन्न गटातील मुली.
- 2) सध्या B.Sc / बी.फार्म. / बी.टेक. / B.E. किंवा M.Sc. / एम.फार्म. / एम.टेक. / M.E या अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनी.
- 3) बीएस्सी / बी.फार्म. / बी.टेक. / B.E. किंवा M.Sc. / एम.फार्म. / एम.टेक. / M.E यांसारखी कोणताही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या आणि त्यांची बॅचलर किंवा पदव्युत्तर पदवी मिळविल्यानंतर एक वर्षाच्या आत उद्योजकतेमध्ये करियर करू इच्छिनाऱ्या मुली.
हे वाचा 👉 सरकारी नौकरीची दररोज नवीन माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
आवश्यक कागदपत्रे ( Documents Required) :
- 1) संशोधन प्रकल्प किंवा उद्योजकता प्रकल्प प्रस्ताव –
- 2) ईयत्ता 12 वी ची मार्कशीट
- 3) मागील उत्तीर्ण झालेल्या परीक्षेचे मार्कशीट
- 4) उत्पन्न गट पुरावा (नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र किंवा उत्पन्न प्रमाणपत्र)
हे वाचा 👉 मोफत शिलाई मशीन योजना ही बनावट बातमी ! नक्की काय आहे ते पहा | Free Silai machine Yojana is fake news
◊ WE ज्ञान शिष्यवृत्तीबद्दल माहितीपुस्तिका डाउनलोड करण्याकरिता :
◊ WE ज्ञान शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्जासाठी लिंक :
◊ WEnyan scholarship – अधिक माहितीसाठी :
◊ WE ज्ञान शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख :
- १५ जुलै २०२३
◊ WEnyan scholarship – Contact for queries
- [email protected]
- Phone: 7823892474 (10 am to 5 pm) Monday – Friday
WEnyan scholarship in marathi , WEnyan scholarship in marathi information , WEnyan scholarship in marathi mahiti