Free Ration : राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत देशात रेशन मोफत वाटले जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारवर 2 लाख कोटींचा अतिरीक्त बोजा पडणार आहे. प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेप्रमाणे(Pradhan Mantri Garib Kalyan Yojana) ही योजना आहे.
Free Ration
Good news for ration card holders will get free ration food
सरकार राष्ट्रीय खाद्य सुरक्षा एक्ट के तहत चावल, गेंहू और मोटा अनाज क्रमश: 3, 2 और 1 रुपए प्रति किलो की दर से देती है।सरकार ने फैसला लिया है कि दिसंबर 2023 तक यह पूरी तरह से मुफ्त में मिलेगा। इससे 81.35 करोड़ लोगों को फायदा होगा:केंद्रीय खाद्य और सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल pic.twitter.com/UczfV6EBBq
— ANI_HindiNews (@AHindinews) December 23, 2022
हे वाचा 👉 राज्य सरकार अंतर्गत शेळीपालन योजना (Sheli Palan Yojana) – ऑनलाईन अर्ज सुरु | पहा कशी आहे हि योजना
Free Ration : केंद्र सरकारचा निर्णय
सरकारने नवीन वर्षापूर्वी जनतेला भेट दिली आहे. आता लोकांना डिसेंबर 2023 पर्यंत मोफत रेशन मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बैठकीनंतर सांगितले की, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत आता 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य मिळणार आहे. गोयल पुढे म्हणाले की, डिसेंबर 2023 पर्यंत लोकांना अन्नधान्य मिळवण्यासाठी एक रुपयाही द्यावा लागणार नाही. त्यांच्या मते यावर सरकार दरवर्षी सुमारे दोन लाख कोटी रुपये खर्च करेल.
Free Ration : लोकांना किती तांदूळ आणि गहू मिळणार ?
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत, सरकार सध्या प्रति व्यक्ती 5 किलो धान्य 2 ते 3 प्रति किलो या दराने पुरवले जाते. अंत्योदय अन्न योजना (AAY) अंतर्गत समाविष्ट कुटुंबांना दरमहा ३५ किलो धान्य मिळते. या कायद्यानुसार गरीबांना तांदूळ ३ रुपये किलो आणि गहू २ रुपये किलोने मिळतो.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत मोफत अन्नधान्य पुरविण्याचा संपूर्ण भार केंद्र सरकार उचलणार आहे .
Good news for ration card holders | get free ration food | Free Ration