वाढत्या तापमानामुळे, महाराष्ट्र राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर (Holiday announced for schools in Maharashtra) , उष्णतेची तीव्रता लक्षात घेता राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना २१ एप्रिलपासून “Holiday announced for schools in state” सुटी जाहीर करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत राज्य शासनाने परिपत्रक जाहीर केले आहे ते खाली या लेखा मध्ये आहे त्या साठी संपूर्ण हा लेख पाहावा हि विनंती. https://mahitivibhag.com/holiday-announced-for-schools-in-state/
Holiday announced for schools in state
महाराष्ट्र राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर ,Holiday announced for schools in state ,Holiday announced for schools in Maharashtra,राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर
शासन परिपत्रक:
राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याची तसेच शाळा सुरु करण्याच्या अनुषंगाने निर्देश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.
राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर
सध्या असलेली उष्णतेची तीव्रता लक्षात घेता राज्य मंडळाच्या शाळांना दि. २१ एप्रिल पासून सुट्टी देण्यात येत आहे. सुटीच्या कालावधीत ज्या शाळांना अतिरिक्त उपक्रम राबवायचे असतील त्यांनी ते सकाळच्या अथवा संध्याकाळच्या सत्रात घ्यावेत- शालेय शिक्षण मंत्री @dvkesarkar pic.twitter.com/Tsd1i9DseM
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 20, 2023
त्यानुसार याअनुषंगाने पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
- १) राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक २१.०४.२०२३ पासून सुटी जाहीर करण्यात येत आहे.
- २) राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा.
- ३. राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत एकवाक्यता राहण्याच्या दृष्टीने विदर्भ वगळता सर्व विभागातील शाळा दरवर्षी दिनांक १५ जून रोजी व त्या दिवशी सुटी असल्यास त्याच्या पुढील दिवशी सुरू होतील व विदर्भ विभागातील शाळा दरवर्षी दिनांक ३० जून रोजी व त्यादिवशी सुटी आल्यास त्याच्या पुढील दिवशी सुरू होतील.