Breaking News

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ! १० लाखापर्यंत अनुदान – उद्योजक होण्याची सुवर्णसंधी

सध्या कार्यरत असलेल्या सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाचा (Micro food processing industries) विस्तार वाढविण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच नविन अन्न प्रक्रिया उद्योग {Food processing Entrepreneur} सुरु करण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनाPradhan Mantri Micro Food Processing Industry Yojana” सुरु केली आहे. या योजनेंतर्गत उद्योग उभारण्यासाठी वैयक्तिक व गटासाठी १० लक्ष रुपये अनुदान तर कोणत्याही गट किंवा कंपनीला सामाईक पायभुत सुविधांच्या (CSC) उभारणीसाठी प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के आणि जास्तित जास्त ३ कोटी पर्यंत अनुदान देण्यात येत आहे. Micro Food Processing Scheme या योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १७५ लाभर्थ्यांना ५ कोटी रुपये कर्ज मंजुर करण्यात आले असुन काही उद्योगही उत्तम प्रकारे सुरु झाले आहेत.  https://mahitivibhag.com/micro-food-processing-scheme/

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना

 

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना

वैयक्तिक मालकी भागीदारी, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट, अशासकीय संस्था, सहकारी संस्था, खासगी कंपनी, यांना एकूण प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के आणि जास्तीत जास्त १० लाखांपर्यंत अनुदानाचा लाभ देण्यात येतो.

हे वाचा 👉WE ज्ञान शिष्यवृत्ती मार्फत 15,000 प्रति महिना शिष्यवृत्ती मिळणार- पहा संपूर्ण माहिती | WEnyan scholarship

Micro Food Processing Scheme

सुक्ष्म अन्न प्रक्रिया गट उद्योगाना लाभ (सामाईक पायाभुत सुविधा)

शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, स्वयंसहायता गट आणि त्यांचे फेडरेशन, शासकीय संस्थांना प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के आणि जास्तीत जास्त तीन कोटींपर्यंत अनुदानाचा लाभ देण्यात येतो. मार्केटींग व ब्रॅंडिंग यासाठी पात्र प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के, कमाल आर्थिक मर्यादा केंद्र शासनाकडून विहित करण्यात आलेली आहे.

बीज भांडवलग्रामीण व शहरी भागातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगातील स्वयंसहायता गटातील सदस्य, गट, त्यांचे फेडरेशन यांना लहान मशिनरी खरेदी करण्यासाठी व खेड ते भांडवल म्हणून प्रत्येक सदस्य कमाल चाळीस हजार रुपये व स्वयंसहाय्यता गटाला कमाल चार लाख रुपये देण्यात येते.

हे वाचा 👉 महाराष्ट्रात ‘जत्रा शासकीय योजनांची’, प्रत्येक जिल्ह्यातील ७५ हजार जणांना थेट शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार महासंकल्प

काय आहे योजनेचा उद्देश ?

  • अन्न प्रक्रिया उद्योगाच्या पतमर्यादा वाढवून उत्पादनांचे ब्रॅंडिंग व विपणन अधिक बळकट करून संघटित साखळीशी जोडणे, सामाईक प्रक्रियासुविधा, प्रयोगशाळा, साठवणूक, पॅकेजिंग, विपणन तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्वकष सेवांचा सूक्ष्मउद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे हेप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा उद्देश आहे.

कोठे संपर्क करावा

  • केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेण्यासाठीइच्छुकांनी केंद्र शासनाच्या https://pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. तसेच अधिक माहितीसाठी जवळील कृषी विभागाच्या कार्यालयांशी संपर्क साधता येईल.

हे वाचा 👉SBI Foundation मार्फत विद्यार्थ्यांना 50,000 ते 2 लाख शिष्यवृत्ती, लगेच करा अर्ज | SBI Asha Scholarship Program 2023

Food Processing Yojana

कोणते अन्नप्रक्रिया उद्योग

♦ दूध प्रक्रिया :

  • खवा, बर्फी, पेढे, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, ताक, दही, तूप,लस्सी.

♦ मसाले प्रक्रिया :

  • चटणी मसाला, कांदा-लसूण मसाला, मालवणी मसाला,मटण-चिकन मसाला, गोडा मसाला, शेंगदाणा चटणी, खोबरे चटणी, कारल्याची चटणी, जवसाची चटणी.

♦ पालेभाज्या व फळे प्रक्रिया :

  • आंबा, सिताफळ, पेरु, सफरचंद, आवळा,मोसंबी, लिंबू, चिंच, बोर, जांभूळ इत्यादीपासून प्रक्रिया उद्योग, जाम, जेली,
  • आईस्क्रीम, रबडी, काजू, बदाम, पिस्ता, बेदाणा, ड्रायफ्रूट इत्यादी रेडी टू इट प्रक्रिया अंतर्गत येणारे सर्व खाद्यपदार्थ पॅकिंग ब्रॅंडिंगसह सर्व प्रकारची फळे तसेच सर्व प्रकारच्या पालेभाज्या प्रक्रिया उद्योग यात येतात.

♦ तेलघाणा प्रक्रिया :

  • शेंगदाणा, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, बदाम व सर्व प्रकारची तेल उत्पादने.

♦ पावडर उत्पादन प्रक्रिया:

  • काश्मिरी मिरची, लवंगी मिरची, स्पेशल मिक्स, ज्वारी, गहू, मिरची, धना, जिरे, गूळ, हळद.

♦ पशुखाद्य निर्मिती :

  • मक्का चुनी, गहू आटा, सरकी पेंड, गोळी पेंड, भरड धान्य इत्यादी.

♦ कडधान्य प्रक्रिया :

  • हरभरा व इतर डाळी (पॉलिश करणे), बेसन तयार करणे इत्यादी.

♦ राईस मिल :

  • चिरमुरे, तांदूळ, पोहा प्रक्रिया इत्यादी.

♦ बेकरी उत्पादन प्रक्रिया:

  • बिस्कीट, खपली गहू बिस्कीट, मैदा बिस्कीट,नानकटाई, क्रीमरोल, म्हैसूर पाक, केक, बर्फी, खारी, टोस्ट, ब्रेड, बनपाव, शेव, फरसाण, चिवडा, भडंग, केळी चिप्स, बटाटा चिप्स, फुटाणे, चुरमुरे.

हे वाचा 👉 सरकारी नौकरीची दररोज नवीन माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा   

Pradhan Mantri Micro Food Processing Industry Yojana

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना बाबत अधिक माहितीसाठी

mahitivibhag

हे वाचा 👉आनंदाची बातमी.!! एक शेतकरी एक डीपी योजना 2023 सुरु – लगेच पहा शासन निर्णय | Ek Shetkari Ek Dp Yojana

हे वाचा 👉 महाडीबीटी शेतकरी योजना साठी नवीन पोर्टल लिंक सुरु | लगेच पहा | Mahadbt Maharashtra Farmer Schemes Farmer Login New Portal 2023

 

Check Also

PM Kisan Yojana 15th Installment

PM Kisan Yojana 15th Installment latest Update | PM किसान योजना 15 वा हप्ता २००० रुपये हस्तांतरित

PM Kisan Yojana 15th Installment latest Update : PM किसान योजना 15 वा हप्ता {PM Kisan Yojana 15th Installment } 15 नोव्हेंबर 2023 रोजी, [PM Kisan Yojana] पंतप्रधान नरेंद्र मोदी PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 15 वा हप्ता जारी.

Delhi Air Pollution: Today Live

Delhi Air Pollution : दिल्ली वायु प्रदूषण | What is the solution for indoor air pollution in Delhi ?

Delhi Air Pollution : The air quality in Delhi, Delhi Air Pollution News ,Delhi Air Pollution: Today Live , Delhi Air Pollution: Air Quality