Krushi Yantrikikaran Yojana 2022 : कृषी साधनांच्या खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकर्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून शेतकरी कमी श्रम करून अधिक पिके घेतील आणि पिकांच्या उत्पन्नात वाढ होईल. महाराष्ट्र सरकार ने नुकताच Krushi Yantrikikaran Yojana 2022 साठी ऑनलाइन रजिस्टर प्रक्रिया सुरू केलेली आहे. या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला Krushi Yantrikikaran Yojana 2022 याबद्दल सविस्तर माहिती खाली दिलेली आहे . Krushi Yantrikikaran Yojana , Krushi Yantrikikaran Yojana 2022 , MahaDBT 2022 , Sarkari Yojana 2022 , MahaDBT Krushi Yantrikikaran Yojana 2022 .
कृषी यांत्रिकीकरण योजना 2022
उद्देश :
- जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे.
प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे.
अनुदान :
या योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल
- १) ट्रॅक्टर
- २) पॉवर टिलर
- ३) ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
- ४) बैल चलित यंत्र/अवजारे
- ५) मनुष्य चलित यंत्र/अवजारे
- ६) प्रक्रिया संच
- ७) काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
- ८) फलोत्पादन यंत्र/अवजारे
- ९) वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
- १०) स्वयं चलित यंत्रे
हे वाचा – (PM SVANidhi) पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत 50 हजार रू. कर्ज मिळणार | ऑनलाईन अर्ज सुरू
भाडे तत्वावरील सुविधा केंद्र:
- १) कृषि अवजारे बँकेची स्थापना
- २) उच्च तंत्रज्ञान , उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना
कृषी यांत्रिकीकरण योजना पात्रता :
- शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
- शेतकऱ्याकडे 7/12 उतारा व 8 अ असावा.
- शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक.
- फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार.
- कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक.
- एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील 10 वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल. उदा. एखाद्या शेतकऱ्याला सन 2018-19 मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील 10 वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन 2019-20 मध्ये इतर औजारासाठी लाभापात्र राहील.
कृषी यांत्रिकीकरण योजना आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- ७/१२ उतारा
- ८ अ दाखला
- खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
- जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
- स्वयं घोषणापत्र
- पूर्वसंमती पत्र
————————————————————-
सूचना : तपशीलवार जाहिरात वाचण्याची विनंती.
————————————————————-