वैद्यकीय शिक्षण मराठी भाषेतून होणार (Medical Education In Marathi) : एमबीबीएस आणि इंजिनीअरिंगचे शिक्षण मातृभाषेतून देण्याचे प्रयत्न सुरु असताना आता वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीतही महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता वैद्यकीय शिक्षण हे मराठी भाषेतून सुरू करण्यात येणार आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Medical Education In Marathi
Medical Education In Marathi : वैद्यकीय शिक्षण क्षेत्राशी संबंधित एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. वैद्यकीय शिक्षण हिंदीतून करण्याचा मध्य प्रदेश (Madhy Pradesh) सरकारच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील आता मराठीतून वैद्यकीय शिक्षण (Marathi Medical Education) घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेणं सोपं होणार आहे.
हे वाचा – वैद्यकीय शिक्षण मराठी भाषेतून होणार (Medical Education In Marathi) राज्य सरकारचा मोठा निर्णय
या शाखांचा अभ्यासक्रम मराठीतून
Medical Education In Marathi :मराठीत वैद्यकीय शिक्षणाचा हा निर्णय शैक्षणिक वर्ष 2023 पासून लागू होणार आहे. या अंतर्गत यापुढे एमबीबीएससह (MBBS) आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी यांसारखे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मराठीतून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मराठीतून वैद्यकीय शिक्षण (Medical Education In Maharashtra) घेणं बंधनकारक राहणार नाही, ते ऐच्छिक असेल. अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे.
वैद्यकीय शिक्षण मराठी भाषेतून होणार
Medical Education In Marathi : दरम्यान, महाराष्ट्रामध्ये एमबीबीएसचे शिक्षण देण्यासाठी एकूण 62 महाविद्यालये आहेत. त्यात 10,045 विद्यार्थी शिक्षण घेतात. यामध्ये सरकार आणि महापालिकेची 27, खासगी 20, अभिमत विद्यापीठ 12 तर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील 3 मेडिकल कॉलेजेस आहेत. विद्यार्थ्यांना मराठीतून वैद्यकीय शिक्षण हा संपूर्ण ऐच्छिक पर्याय असणार आहे. आता विद्यार्थी मराठी भाषेतून एमबीबीएस, आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी यांसारखे अभ्यासक्रम शिकू शकतील. वैद्यकीय अभ्यासक्रम (Medical Education) हिंदीतून (Hindi) उपलब्ध करून देण्याचा मध्य प्रदेश (Madhy Pradesh) सरकारचा निर्णय ताजा असतानाच, आता महाराष्ट्रातही मराठीतून वैद्यकीय शिक्षण (Marathi Medical Education) घेण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळं याचा फायदा हजारो विद्यार्थ्यांना होणार आहे.