Breaking News

कृषी विभाग जिल्हा परीषद सांगली मार्फत ट्रॅक्टर, पावर टिलर, कडबाकुट्टी मशिन लाभ | औजारे अनुदानासाठी अर्ज सुरु

ZP Sangli Agriculture Scheme : कृषी विभाग जिल्हा परीषद सांगली मार्फत स्विय निधी योजना अंतर्गत आयुधे/ औजारे लाभ . सन २०२२-२३ मध्ये शेतकऱ्यांसाठीच्या योजना ट्रॅक्टर, पावर टिलर, कडबाकुट्टी मशिन ई. औजारे अनुदानासाठी अर्ज सुरु . ZP Sangli Agriculture Scheme , कृषी विभाग जिल्हा परीषद स्विय निधी योजना , Zilla Parishad Sangli .  ZP Sangli Agriculture Scheme

सदर अर्जामध्ये मागणी केलेल्या आयुधे / औजारे नाव, आयुधे/औजारे कोटेशन क्र. व दिनांक, बँकेचे पूर्ण नाव व शाखा, बँकेचा खाते नंबर (आधारकार्डशी जोडलेला असावा), बँकेचा आय एफ एस सी (IFSC)  नंबर, आधार कार्ड क्रमांक, इत्यादी तपशील योग्यरीत्या लिहून दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र, आणि जात प्रमाणपत्र (मागासवर्गीय अनुसूचित जाती/जमाती ) असल्यास जोडावे.

कृषी विभाग जिल्हा परीषद सांगली मार्फत शेतकऱ्यांसाठीच्या योजना ट्रॅक्टर, पावर टिलर, कडबाकुट्टी मशिन ई. औजारे अनुदानासाठी अर्ज सुरु

ZP Sangli Agriculture Scheme

◆  योजने बाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे :

१) कडबाकुट्टी मशिन (chaffcutter) २ एच.पी. इलेक्ट्रीक मोटरसह (ISI mark) योजना

  • अनुदान मर्यादा:
    रु.९,०००/- किंवा किमतीच्या ५०% यापैकी जे कमी असेल ते.

२) पावर टिलर (Power Tiller) ८ एच.पी. पेक्षा जास्त क्षमतेचा रोटरीसह योजना

  • अनुदान मर्यादा:
    रु.५०,०००/- किंवा किमतीच्या ४०% यापैकी जे कमी असेल ते

३) ट्रॅक्टर (Tractor) ०८ ते ७० PTOHP योजना

  •  अनुदान मर्यादा:
    रु.९०,०००/- प्रति लाभार्थी

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :

  1. सातबारा खाते उतारा
  2. आयुधे/औजारे कोटेशन
  3. आधार कार्ड स्वयंसाक्षांकित प्रत
  4. बँक पासबुक झेरॉक्स प्रत ( IFSC कोड सहित )
  5. हयातीचे स्वयंघोषणापत्र
  6. लहान कुटुंबाचे स्वयंघोषणापत्र
  7. दिव्याग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र झेरॉक्स प्रत (असल्यास)
  8. मागासवर्गीय अनुसूचित जाती/जमाती या प्रवर्गातील असल्यास त्याबाबत प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दिलेल्या वैध जात प्रमाणपत्राची प्रत
  9. यापूर्वी सांगली जि.प. कडील & या वैयक्तिक योजनेचा लाभ न घेतलेचे हमीपत्र.

◆  लाभार्थी निवड निकष :

  • यापूर्वी जि.प.च्या कडबाकुट्टी मशिन/पावर टिलर/ट्रॅक्टर या वैयक्तिक योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  •  स्वतः चे नावे ७/१२ व खाते उतारा असावा,
  •  महिला लाभार्थी व अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य राहील.
  •  दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल.
  • कडबाकुट्टी मशिन करीता अर्जदार शेतकऱ्याकडे पशुधन असलेबाबतचा पशुवैद्यकीय यंत्रणेचा दाखला

अर्जासोबत सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे : 

  1. विहीत नमुन्यातील मागणी अर्ज
  2. आजारे / आयुधे यापूर्वी घेतले नसलेबाबत तसेच DBT साठी कॅशलेस पध्दतीने खरेदीबाबतचे हमीपत्र
  3. ७/१२ व खाते उतारा (८ अ)
  4. आधारकार्ड झेरॉक्स
  5. आधारकार्डशी संलग्न बैंक पासबुक झेरॉक्स
  6. २ पेक्षा जास्त अपत्य नसलेवायतचे स्वंय घोषणापत्र
  7. दिव्यांग असलेस तसा दाखला

कृषी विभाग जिल्हा परीषद स्विय निधी योजना सूचना :

  • योजनेसाठीचा अर्जाचा नमुना गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे उपलब्ध असून तालुकास्तरावरच मागणी अर्ज आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण करून पं.स.कडे सादर करावा.
  • लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थीने ज्या घटकासाठी अर्ज करावयाचा आहे. त्या घटकाचा जिल्हा परिषदेच्या अन्य योजनेतून लाभ घेतलेला नसावा.
  • लाभार्थी निवड सर्व प्राप्त अर्ज संकलित केलेनंतर लॉटरी पध्दतीने करणेत येईल.
  • मंजूर लाभार्थीने पूर्व समंतीनंतर वरील वस्तूंची खरेदी कॅशलेस पध्दतीने खुल्या बाजारपेठेतून करावयाची असून अनुदानाची रक्कम ऑनलाईन पध्दतीने त्यांचे बँक खातेवर वर्ग करणेत येईल.
  •  विहीत मानकांची तसेच शासकीय मान्यता प्राप्त संस्थेचा तपासणी अहवाल असणारी वस्तू / औजारे खरेदी करणे बंधनकारक राहील. अन्यथा अनुदानास अपात्र ठरविणेत येईल.
  • गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे ३१/०८/२०२२ अखेर प्राप्त अर्जांचा विचार केला जाईल. या तारखेनंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
  • कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषद मुख्यालयामध्ये लाभार्थीचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

कृषी विभाग जिल्हा परिषद सांगली यांचेकडील स्वीय निधी योजनेतून आयुधे / औजारे लाभ मिळणेबाबत अर्ज नमुना डाउनलोड करण्यासाठी

सूचना : तपशीलवार जाहिरात वाचण्याची विनंती.

अधिकृत वेबसाईट : www.zpsangli.com

अधिक माहितीसाठी संपर्क:

  • जिल्हा परिषद सांगली अंर्गत पंचायत समिती मध्ये गट विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

________________________________________________________________________________

कृषी विभाग जिल्हा परीषद सांगली

कृषी विभाग जिल्हा परीषद सांगली  स्विय निधी योजना

ZP Sangli Agriculture Scheme

Zilla Parishad Sangli

Check Also

aharashtra Home Guards now be given 180 days duty

महाराष्ट्र होमगार्डना आता १८० दिवस काम- सहा महिने सलग काम तसेच दर तीन वर्षांनी नोंदणीची अटही रद्द | Maharashtra Home Guard

Maharashtra Home Guard : राज्य गृहरक्षक दलासंबंधित राज्यातील होमगार्ड (Home Guard) सैनिकांना आता १८० दिवस काम दिले जाईल.

Shivaji University Result

Shivaji University Result : New Link Updated | शिवाजी विद्यापीठ निकाल पाहण्यासाठी नवीन लिंक उपलब्ध

Shivaji University online Result : New Link Updated | FY, SY,TY - BA ,BSc, BCom, BBA, BCA, परीक्षेचे शिवाजी विद्यापीठ निकाल पाहण्यासाठी नवीन लिंक उपलब्ध. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर (SUK) .