Breaking News

HSC Exam Hall Ticket 2022: बारावीचे ऑनलाइन हॉलतिकीट आज 9 फेब्रुवारी दुपारी 1 वाजल्यापासून उपलब्ध

HSC EXAM Hall Ticket 2022: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education) शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी घेण्यात येणाऱ्या 12 वी (12 th Board Exam) परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. HSC EXAM Hall Ticket

HSC EXAM Hall Ticket 2022

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता बारावीच्या मार्च- एप्रिल 2022 परीक्षेचे ऑनलाइन हॉलतिकीट सर्व विद्यार्थ्यांना बुधवारी 9 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 1 वाजल्यापासून कॉलेज लॉगइनमध्ये उपलब्ध होणार आहे. महाविद्यालयांनी हॉलतिकीट डाऊनलोड करून प्रिंट घेऊन विद्यार्थ्यांना द्यायचे आहे. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारी ते 03 मार्च 2022 या कालावधीत होणार आहे तर लेखी परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

हॉलतिकीट www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कॉलेज लॉगइन मध्ये डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील. यासंदर्भात काही तांत्रिक अडचण आल्यास कॉलेजांनी विभागीय मंडळाशी संपर्क साधायचा आहे.

हॉलतिकीट देण्यासाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी घ्यायची आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे दोन वर्षांपासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. ऑनलाईन क्लास घेण्यात येत आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय मोडली. विद्यार्थ्यांचा लिखाणा वेग कमी झाल्यामुळे परीक्षेचा कालावधी अर्धा तासाने वाढवण्यात आला आहे.

अधिकृत वेबसाईट : www.mahahsscboard.in 

Check Also

PM Kisan Yojana 15th Installment

PM Kisan Yojana 15th Installment latest Update | PM किसान योजना 15 वा हप्ता २००० रुपये हस्तांतरित

PM Kisan Yojana 15th Installment latest Update : PM किसान योजना 15 वा हप्ता {PM Kisan Yojana 15th Installment } 15 नोव्हेंबर 2023 रोजी, [PM Kisan Yojana] पंतप्रधान नरेंद्र मोदी PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 15 वा हप्ता जारी.

Delhi Air Pollution: Today Live

Delhi Air Pollution : दिल्ली वायु प्रदूषण | What is the solution for indoor air pollution in Delhi ?

Delhi Air Pollution : The air quality in Delhi, Delhi Air Pollution News ,Delhi Air Pollution: Today Live , Delhi Air Pollution: Air Quality