Breaking News

महाराष्ट्रात 10 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू | काय सुरू, काय बंद? वाचा संपूर्ण नियमावली

महाराष्ट्रात 10 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू : ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे कोविड – 19 च्या प्रसाराची भीती राज्यातील नागरीकांच्या मनात निर्माण झाली आहे, याची दखल घिऊन महाराष्ट्र शासनाने या विषाणूला रोखण्यासाठी काही तातडीची पावले उचलण्याचे ठरविले आहे. त्यानुसार खाली दिलेले निर्बंध व नियम 10 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून लागू होतील,  या निर्बंधांची यादी राज्य शासनाने प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर केली.maharashtra mini lockdown

New restrictions in maharashtra

महाराष्ट्रात लागू असलेले निर्बंध खालील प्रमाणे

  1. पहाटे पाच ते रात्री ११ या वेळेत पाच किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांना एकत्र वावरण्यास बंदी तसेच रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी
  2. आस्थापनांनी ‘वर्क फ्रॉम होम’वर भर द्यावा, अत्यावश्यक असल्यास कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवावे. कार्यालयात एकावेळी एकूण कर्मचाऱ्यांच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थितीला बंदी
  3. ज्यांचे लसचे दोन डोस घेऊन झाले आहेत अशा कर्मचाऱ्यांनाच कार्यालयात प्रवेश करण्याची परवानगी इतरांना कार्यालयात प्रवेशबंदी
  4. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाच्या शरीराचे तापमान मोजण्याचे आणि सामान्य तापमान असलेल्यांनाच प्रवेश देण्याचे बंधन. कार्यालयात सॅनिटायझरची व्यवस्था ठेवण्याचे बंधन.
  5. लग्नासाठी जास्तीत जास्त ५० जणांना आणि अंत्यसंस्कारासाठी जास्तीत जास्त २० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी
  6. राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि अन्य कोणत्याही कार्यक्रमाला जास्तीत जास्त ५० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी
  7. शाळा आणि कॉलेज १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत बंद राहतील. प्रशासकीय काम, लसीकरण, ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी शाळा-कॉलेजमध्ये येणारे शिक्षक यांना प्रवेश मिळेल पण त्यासाठी त्यांना लसचे दोन डोस घेण्याचे बंधन लागू असेल. शरीराचे सामान्य तापमान असलेल्यांनाच शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल.
  8. जलतरण तलाव, व्यायामशाळा, स्पा, वेलनेस सेंटर पुढील आदेशापर्यंत बंद
  9. जिम , ब्युटी पार्लर 50 % क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी
  10. केस कापण्याच्या सलूनमध्ये एकावेळी जास्तीत जास्त ५० टक्के उपस्थितीला परवानगी. सलून रात्री १० ते सकाळी ७ या वेळेत बंद असेल. लसचे दोन डोस घेतलेल्या आणि शरीराचे सामान्य तापमान असलेल्यांनाच सलूनमध्ये प्रवेश.
  11. प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरू आणि खेळाडूंचा सराव सुरू राहील. स्पर्धेशी संबंधित अधिकारी-कर्मचारी, खेळाडू, प्रशिक्षक आणि खेळाडूंसोबत असलेले फिजिओ, डाएट एक्स्पर्ट आदींना केंद्र सरकारच्या नियमांनुसार क्वारंटाइनच्या बंधनांचे पालन करावे लागेल. स्पर्धेशी संबंधित अधिकारी-कर्मचारी, खेळाडू, प्रशिक्षक आणि खेळाडूंसोबत असलेले फिजिओ, डाएट एक्स्पर्ट आदींना दर तिसऱ्या दिवशी आरटीपीसीआर चाचणी करुन घ्यावी लागेल. इतर खेळांच्या स्पर्धांना आणि सरावाला बंदी.
  12. मनोरंजनाची उद्याने, प्राणीसंग्रहालये, अभयारण्ये, संग्रहालये, किल्ले, सर्व पर्यटनस्थळे आणि जिथे तिकीट काढून जावे लागते अशी पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत बंद
  13. मॉल, मार्केट येथे लसचे दोन डोस घेतलेल्या आणि शरीराचे सामान्य तापमान असलेल्यांनाच प्रवेश. मॉल आणि मार्केट रात्री १० ते सकाळी ८ पर्यंत बंद राहतील. क्षमतेच्या ५० टक्के नागरिकांनाच प्रवेश देण्याचे बंधन.
  14. रेस्टॉरंट तसेच लहान-मोठी हॉटेल येथे क्षमतेच्या ५० टक्के नागरिकांनाच प्रवेश देण्याचे बंधन. लसचे दोन डोस घेतलेल्या आणि शरीराचे सामान्य तापमान असलेल्यांनाच प्रवेश देण्याचे बंधन. रात्री १० ते सकाळी ८ पर्यंत बंद. होम डीलिव्हरी सुरू राहील.
  15. नाट्यगृह आणि सिनेमागृह येथे क्षमतेच्या ५० टक्के नागरिकांनाच प्रवेश देण्याचे बंधन. लसचे दोन डोस घेतलेल्या आणि शरीराचे सामान्य तापमान असलेल्यांनाच प्रवेश देण्याचे बंधन. रात्री १० ते सकाळी ८ पर्यंत बंद.
  16. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार आंतरराष्ट्रीय पर्यटनाला परवानगी
  17. लसचे दोन डोस घेतलेल्या आणि शरीराचे सामान्य तापमान असलेल्यांनाच राष्ट्रीय पर्यटनासाठी परवानगी. ७२ तासांपूर्वीचा निगेटिव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट असल्यास पर्यटनाला परवानगी.
  18. लसचे दोन डोस घेतलेल्या आणि शरीराचे सामान्य तापमान असलेल्यांनाच मालवाहतूक करण्यास परवानगी.
  19. सार्वजनिक वाहतूक सुरू. लसचे दोन डोस घेतलेल्या आणि शरीराचे सामान्य तापमान असलेल्यांनाच प्रवेश.
  20. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार स्पर्धा परीक्षा आणि केंद्रीय संस्थांच्या अखत्यारितील परीक्षा होतील. तसेच राज्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार राज्याच्या अखत्यारितील परीक्षा होतील.
  21. निगेटिव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट, लसचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र, शरीराचे सामान्य तापमान आणि योग्य तिकीट सोबत असल्यास रेल्वे, विमान, बसमधून प्रवासाकरिता परवानगी.
  22. अत्यावश्यक अधिकारी-कर्मचारी यांना लसचे दोन डोस घेतले असतील आणि शरीराचे सामान्य तापमान असेल तर कामासाठीच्या प्रवासाला परवानगी.
  23. सरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी लसचे दोन डोस आणि शरीराचे सामान्य तापमान ही दोन बंधने लागू असतील. उपस्थितीच्या मर्यादेचे आणि नियमांचे पालन करुन काम करता येईल.
  24. स्थानिक प्रशासनाने परिस्थितीनुसार काही नवे निर्बंध लागू केल्यास त्यांचे संबंधित भागात पालन करण्याचे बंधन

new restrictions in maharashtra

Check Also

घरबसल्या जेष्ठ नागरिकांसाठी मतदान करण्याची सुविधा

आता घरबसल्या जेष्ठ नागरिकांसाठी मतदान करण्याची सुविधा | Voting facility available for senior citizens at home

आता घरबसल्या जेष्ठ नागरिकांसाठी मतदान करण्याची सुविधा ,मतदानाचा टक्का वाढावा, तसेच ज्येष्ठांना मतदान करणे सोईचे व्हावे | Voting facility available for senior citizens at home

PM Suryaghar Yojana

PM Suryaghar Yojana | पीएम सूर्यघर योजना अंतर्गत दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज -पहा संपूर्ण माहिती

PM Suryaghar Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत विजेसाठी घराच्या छतावरील सौर योजना ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ {PM Surya Ghar free electricity scheme} सुरू करण्याची घोषणा केली.(PM Surya Ghar mofat vij Yojana)