Breaking News

स्वस्त धान्य दुकान परवाना | नवीन स्वस्त धान्य दुकान सुरू करण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण विभाग यांच्या शासन निर्णयानुसार गावामध्ये {Swast Dhanya Dukan}नवीन स्वस्त धान्य दुकान चालू करण्याकरिता शासनाच्या वतीने परवान्याची वितरण करण्यात येत असते. (Swast Dhanya Dukan License) स्वस्त धान्य दुकान पुणे जिल्हा करिता परवाना [Swast Dhanya Dukan Parwana] वितरण करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. https://mahitivibhag.com/swast-dhanya-dukan-license-application/

Swast Dhanya Dukan License Application

 

Swast Dhanya Dukan License Application

स्वस्त धान्य दुकान परवाना

Ration Shop | Swast Dhanya Dukan | Swast Dhanya Dukan Parwana | Swast Dhanya Dukan Parwana in marathi information | Swast Dhanya Dukan Parwana maharashtra | स्वस्त धान्य दुकान परवाना | Swast Dhanya Dukan Arj

महाराष्ट्र शासनाचे रास्तभाव / शिधावाटप दुकाने व केरोसीन परवाने मंजूर करणेबाबत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांजकडील शासन निर्णय क्र. राभादु-१७१६/प्र.क्र.२३९/नापु-३१, दिनांक ०६ जुलै २०१७ अन्वये निर्णय घेतला आहे. सदर शासन निर्णयानुसार दिनांक ०३ नोव्हेंबर २००७ चा शासन निर्णय तसेच २५ जून २०१० च्या शासन पत्राव्दारे दिलेल्या सूचना अधिक्रमित करुन राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ च्या कलम १२(२) (e) मधील तरतूदींचा समावेश सदर शासन निर्णयामध्ये केलेला आहे.

त्यानुसार सध्याचे रास्तभाव दुकान परवाने तसेच ठेवून आजमितीस रद्द असलेले व यापुढे रद्द होणारे, राजीनामा दिलेले व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाचे तसेच विविध कारणांमुळे भविष्यात द्यावयाचे रास्तभाव दुकाने सदर शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या प्राथम्यक्रमानुसार मंजूर करावयाचे आहेत.

शासन परिपत्रक क्रमांक राभादु-२११७/प्र.क्र.१५७/नापु-३१, दिनांक ०२ फेब्रुवारी २०२२ अन्वये रास्तभाव दुकान मंजूर करण्यासाठी वर्षभराचा सुधारीत सहामाही कालबध्द कार्यक्रम व कालावधी ठरवून देण्यात आलेला आहे.

mahitivibhag
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

त्यानुसार पुणे जिल्हा ग्रामीणमधील स्वस्त धान्य दुकान परवाने मंजूरीसाठी खाली नमूद तालुकानिहाय गावी /ठिकाणी नवीन रास्तभाव दुकान देणेकामी जाहीरनामा प्रसिध्द करण्यात येत आहे.

mahitivibhag

also Read this : MSRTC ST bus ticket with UPI payment : एसटी प्रवासात तिकीटाचे पैसे यूपीआय क्यूआर कोडद्वारे ऑनलाइन देता येणार !

Name of Village/Place to be granted Rastabhav Shop License as follows

रास्तभाव दुकान परवाना मंजुर करावयाचे गाव/ठिकाणाचे नाव पुढीलप्रमाणे :

Swast Dhanya Dukan License

 

mahitivibhag

also Read this : How to Apply CSC Center | नवीन CSC केंद्र सुरू करण्यासाठी ‘अशा पद्धती’ने करा ऑनलाईन अर्ज- कागदपत्रे,पात्रता इ जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

 

Swast Dhanya Dukan License

Swast Dhanya Dukan License

mahitivibhag

also Read this : WhatsApp Secret Code feature For Chat | Whatsapp चं नवं सिक्रेट कोड फिचर, कुणीच वाचू शकणार नाही तुमचे पर्सनल चॅट; कसे सक्रिय करायचे ते जाणून घ्या

Swast Dhanya Dukan License

 

वरीलप्रमाणे ठिकाणांसाठी अर्ज संबंधीत तहसिल कार्यालयाचे पुरवठा शाखेमध्ये रु.१०/- शासनजमा करुन घेऊन उपलब्ध होतील. सदरचे अर्ज दिनांक 01 जानेवारी 2024 ते दिनांक 31 जानेवारी २०24 पर्यंत कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टी वगळून) संबंधीत तहसिल कार्यालयाचे पुरवठा शाखेमध्ये स्विकारण्यात येतील. उपरोक्त नमूद शासन निर्णयानुसार इच्छूक पंचायत / संस्था / गट यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधीत तहसील कार्यालयाकडे मुदतीत अर्ज सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

mahitivibhag

हे वाचा 👉विविध सरकारी योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

स्वस्त धान्य दुकान परवाना मिळवण्याकरिता खालील प्रमाणे प्राधान्यक्रम –

  1. पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था )
  2. नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट
  3. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था
  4. संस्था नोंदणी अधिनियम अंतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास
  5. महिला स्वयंसहायता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था

उपरोक्त नमूद शासन निर्णयान्वये संबंधीतांनी अर्ज केल्यानंतर प्राधान्यक्रमानुसार रास्तभाव दुकान परवाने मंजूर केलेल्या दुकानांचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदायाव्दारे करणे आवश्यक राहील. प्राधान्य सूचीनुसार पंचायत / संस्था / गटांची निवड करताना जेष्ठ, वर्धनक्षम व नियमित कार्यरत असलेल्या व अंतर्गत व्यवहार पारदर्शक व परतफेड चोख व नियमित असलेल्या व प्रतिवर्षी लेखापरिक्षण केलेल्या पंचायत / संस्था / गटास प्राधान्य देण्यात येईल.

नविन स्वस्तधान्य दुकान मिळणेकामी अर्ज केलेल्या पंचायत / संस्था / गटांची आर्थिक स्थिती ही किमान ३ महिन्याचे धान्य उचलण्या इतकी सक्षम असावी.

mahitivibhag

also Read this : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना- कोण लाभ घेऊ शकतात ? | पहा संपूर्ण माहिती

 

Documents required for Swast Dhanya Dukan license

स्वस्त धान्य दुकान परवान्यासाठी आवश्यक कागदपत्रे

स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्याकरिता प्रत्येकाला वेगवेगळी कागदपत्रे लागतात त्यापैकी काही कागदपत्रे ही सर्वांकरिता समान आहेत. जर महिला गटाद्वारे अर्ज केला तर त्यांना वेगळी कागदपत्रे त्याचप्रमाणे सहकारी संस्थेद्वारे अर्ज केला तर त्यांच्याकरिता काही वेगळी कागदपत्रे लागतात. संपूर्ण कागदपत्रे जाणून घेण्याकरिता Swast Dhanya Dukan license मिळवण्याचा जाहीरनामा वाचून घ्यावा.

  1. पंचायत ( ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था ) यांचेसाठी ग्रामसभेचा ठराव, ग्रामपंचायतचा दुकान मागणी अर्ज, तेरीज पत्रक, ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेबाबत गटविकास अधिकारी यांचा दाखला.
  2. पंचायत ( ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्यसंस्था), नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था, संस्था नोंदणी अधिनियम अंतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास यांचे नोंदणी प्रमाणपत्र.
  3. पंचायत / स्वयंसहायता गट / संस्था / सार्वजनिक संस्था / न्यास यांचे आर्थिक स्थितीबाबत कागदपत्र जसे बँक पासबुकची छायांकित प्रत व बँकेचे प्रमाणपत्र / बैंक स्टेटमेंट.
  4. व्यवसाय करावयाच्या जागेचे मालकीबाबत कागदपत्र, जागा भाड्याची असल्यास भाडेपत्र, घर, टॅक्स पावती, ७/२, जागेचे क्षेत्रफळ, व्यवसाय ठिकाणाचे क्षेत्रफळ चौ. फुटमध्ये.
  5. बँकेकडून कर्ज घेतले असल्यास कर्जाचा तपशील व परतफेडीचे प्रमाणपत्र (बँकेचे) व कर्जाची नियमित परतफेड चालू असलेबाबत संबंधीत बँकेचे
  6. प्रमाणपत्र व कर्जाची परतफेड झाली असल्यास संबंधीत बँकेचे कर्ज पूर्ण फेड केल्याबाबतचे प्रमाणपत्र.
    पंचायत / स्वयंसहायता गट / संस्था / सार्वजनिक संस्था / न्यास यांचे वार्षिक लेखे व हिशोब सन २०१८-१९ पासून आजपर्यंत तपासणी केलेल्या संस्थेचा अहवाल.
  7. पंचायत / स्वयंसहायता गट/ संस्था / सार्वजनिक संस्था / न्यास यांचे अध्यक्ष/उपाध्यक्ष /सचिव व सर्व सभासदांची नावे, पूर्ण पत्यासह.
  8. पंचायत / स्वयंसहायता गट / संस्था / सार्वजनिक संस्था / न्यास यांचे मूळ व आजचे भागभांडवल व सध्या करीत असलेले व्यवसाय व कार्याची संपूर्ण माहिती.
  9. रास्तभाव दुकान परवाना मिळण्याबाबत व व्यवसाय करण्यासाठी संमती दर्शविलेला पंचायत / स्वयंसहायता गट / संस्था / सार्वजनिक संस्था / न्यास यांचा ठराव.
  10. पंचायत / स्वयंसहायता गट/संस्था/ सार्वजनिक संस्था / न्यास स्वस्त धान्य दुकान स्वतः एकत्रितरित्या चालवतील, कोणीही इतर व्यक्तीस अथवा संस्थेस चालविण्यास देणार नाही किंवा हस्तांतरीत करणार नाही याबाबत प्रतिज्ञापत्र
  11. भाडे तत्वावर दिल्या गेलेल्या जागेसंबंधी मूळ जागा मालकाचे विधीग्राह्य दस्तऐवज.
  12. पंचायत / स्वयंसहायता गट/ संस्था / सार्वजनिक संस्था / न्यास यांचे नावे अन्य कोठेही शिधावाटप दुकान कार्यान्वित नसल्याचे रु. १००/- च्या स्टॅपपेपरवर प्रतिज्ञापत्र. ( सदरची माहिती खोटी असल्याचे भविष्यात निदर्शनास आल्यास नियमाप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल )
  13. पंचायत / स्वयंसहायता गट / संस्था / सार्वजनिक संस्था / न्यास यांचे सदस्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याबाबत रु.१००/- च्या स्टॅपपेपरवर प्रतिज्ञापत्र
  14. स्वयंसहायता गटाचे सभासद दारिद्र्य रेषेखालील असल्यास शिधापत्रिका / ग्रामसेवकांचे पत्र / नगरपालिकेकडील पत्र.

mahitivibhag

हे वाचा 👉 Aadhaar Voter ID linking : मतदान ओळखपत्र आधार कार्ड सोबत लिंक करा | घरबसल्या करा अगदी काही मिनिटातच

सदरचा जाहिरनामा शासन निर्णय क्रमांक राभादु – १७१६/प्र.क्र.२३९ / नापु-३१, दि.०६ जुलै २०१७ मध्ये दिलेल्या अटी व शर्तीच्या आधीन राहुन काढणेत येत आहे.

mahitivibhag

 

पुणे जिल्ह्यामध्ये स्वस्त धान्य दुकान परवाना मिळवण्याकरिता जाहीर करण्यात आलेल्या जाहीरनामा वाचून घ्यावा. वरील जाहीरनाम्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे.

mahitivibhag

also Read this : daily Government job update click here

Ration Shop , Swast Dhanya Dukan , Swast Dhanya Dukan Parwana , Swast Dhanya Dukan Parwana in marathi information ,Swast Dhanya Dukan Parwana maharashtra, स्वस्त धान्य दुकान परवाना ,Swast Dhanya Dukan Arj

mahitivibhag

More Information  : https://mahitivibhag.com

Check Also

students will get ST bus Pass directly in school

आनंदाची बातमी ! MSRTC पास विशेष मोहीम : विद्यार्थ्यांना एसटी बसचा पास थेट शाळेतच मिळणार | MSRTC Pass special campaign : students will get ST bus Pass directly in school

MSRTC Pass special campaign : students will get ST bus Pass directly in school |आनंदाची बातमी ! MSRTC पास विशेष मोहीम : विद्यार्थ्यांना एसटी बसचा पास थेट शाळेतच मिळणार

Chhatrapati Shahu Maharaj Scholarship Scheme

Chhatrapati Shahu Maharaj Scholarship 2024 | परदेशात शिक्षणासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना 2024-लगेच अर्ज करा

Chhatrapati Shahu Maharaj Scholarship: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रतीवर्षी अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. {Rajshree Shahu Maharaj Scholarship Scheme}