Breaking News

(CM Fellowship) मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत पदवीधरांसाठी सुवर्णसंधी | ऑनलाईन अर्ज करा

Chief Minister Fellowship 2023 : “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” (Mukhyamantri Fellowship Yojana Maharashtra) युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील २४ दिवस ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २ मार्च २०२३ असा आहे. Mukhyamantri Fellowship Yojana Maharashtra

Chief Minister Fellowship

हे वाचा 👉 दहावी बारावीच्या परीक्षांपूर्वी बोर्डाचा मोठा निर्णय | पहा संपूर्ण माहिती नाहीतर ‘या’ विद्यार्थ्याना परीक्षेला मुकावे लागणार

Chief Minister Fellowship 2023

Mukhyamantri Fellowship Yojana Maharashtra

मुख्यमंत्री फेलोशिप | cmfellowship| Chief Minister Fellowship | मुख्यमंत्री फेलोशिपसाठी ऑनलाईन अर्ज | Chief Minister Fellowship Apply online |  Chief Minister Fellowship in marathi |  Chief Minister Fellowship marathi information | Chief Minister Fellowship  online form | Chief Minister Fellowship Apply form | Mukhyamantri Fellowship Yojana Maharashtra | Mukhyamantri Fellowship Yojana in marathi | Mukhyamantri Fellowship Yojana Maharashtra marathi information|  Mukhyamantri Fellowship Yojana Maharashtra marathi mahiti 

हे वाचा 👉 नवीन मतदार ओळखपत्र आधार लिंक असलेले डाउनलोड सुरू | मोबाइल वर 2 मिनिटात डाउनलोड करा | New Voter ID Card Download

युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पुढील २४ दिवस ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २ मार्च २०२३ असा आहे. राज्याच्या विकासात योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या तरुण व होतकरू मुला- मुलींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

राज्यातील युवकांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव देत त्यांच्यातील ऊर्जा, धाडस, कल्पकता आणि तंत्रज्ञानातील गतीचा उपयोग करून प्रशासकीय प्रक्रियांना गती देणे, नावीन्यपूर्ण संकल्पना राबविणे हा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांनाही धोरण निर्मिती, नियोजन, कार्यक्रमांची अंमलबजावणी या संदर्भात महत्त्वपूर्ण अनुभव मिळतो. त्यांच्या ज्ञानाच्या व अनुभवाच्या कक्षा रुंदावतात. २०१५ ते २०२० या कालावधीत या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर त्यात खंड पडला होता. लोकाग्रहास्तव हा कार्यक्रम आता पुन्हा सुरू करण्यात येत आहे.

हे वाचा 👉 रिलायन्स फाउंडेशन मार्फत 2 लाखांपर्यंत व 6 लाखांपर्यंत शिष्यवृत्ती | Reliance Foundation Scholarships 2023

पात्रता – Eligibility

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम, २०२३ करिता अर्ज करण्यासाठी पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे आहेत:

  • उमेदवाराचे वय अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास किमान २१ ते कमाल २६ वर्ष या दरम्यान असावे. म्हणजे जीचा वाढदिवस ०३/०३/१९९७ ते ०३/०३/२००२ दरम्यान येतो अशी व्यक्ती (दोन्ही दिवस अंतर्भूत)
  • उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६० टक्के गुण) असावा. तथापि, उच्चतम शैक्षणिक अर्हतेस प्राधान्य दिले जाईल
  •  उमेदवाराकडे किमान एक वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव असावा. व्यावसायिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून केलेली पूर्णवेळ इंटर्नशिप / अप्रेंटीसशिप / आर्टीकलशिप अनुभवाच्या कार्यकाळात गणली जाईल. पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल.
  • मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक राहील. हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील. तसेच, संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील.

हे वाचा 👉 प्रधानमंत्री कौशल विकास योजना – अशी करा नोंदणी | Pradhanmantri Kaushal Vikas Yojana

स्वरूप – format

  •  फेलोशिपचा कार्यकाळ फेलो म्हणून रुजू झाल्याच्या दिनांकापासून १२ महिने राहील. सर्व फेलोंसाठी रुजू होण्याचा दिवस एकच राहील व त्या दिवशी निर्देशित ठिकाणी वेळेत हजर राहण्याचे फेलोंवर बंधन असेल.
  • निवड झालेल्या फेलोची शासनाच्या विशिष्ट प्राधिकरणावर नेमणूक करण्यात येईल. या प्राधिकरणांमध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त, शासनाचे सचिव, महामंडळांचे कार्यकारी संचालक किंवा इतर वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांचा समावेश असेल.
  • प्राधिकरणावरील नेमणुकीचा निर्णय अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत घेतला जाईल. फेलोंना प्राधिकरण निवडीचा अधिकार नसेल.
  • नेमणूक केलेल्या कार्यालयाच्या मुख्य अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली, संबंधित प्राधिकरणाचे काम अधिक प्रभावी व्हावे यासाठी फेलो काम करतील. यास फिल्ड वर्क असे संबोधले जाईल.
  •  फिल्ड वर्क सोबतच आयआयटी, मुंबई किंवा आयआयएम, नागपूर यांनी तयार केलेला विशेष अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे बंधन फेलोंवर असेल. प्रत्येक फेलोसाठी यापैकी एका शैक्षणिक संस्थेची निवड करण्याचे अधिकार अर्थ व सांख्यिकी संचालनालयास असतील. फेलोंना शैक्षणिक संस्था निवडीचा अधिकार नसेल.
  • फिल्ड वर्क व अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या फेलोंनाच फेलोशिप पूर्णत्त्वाचे प्रमाणपत्र मिळेल.

हे वाचा 👉 सरकारी नौकरीची दररोज नवीन माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा   

Apply online for Chief Minister Fellowship

मुख्यमंत्री फेलोशिपसाठी ऑनलाईन अर्ज करा

  • शैक्षणिक पात्रता:  60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + संगणक ज्ञान + पूर्णवेळ इंटर्नशिप/अप्रेंटिसशिप/आर्टिकलशिप केल्याचा एक वर्षाचा अनुभव.
  • वयाची अट: 02 मार्च 2023 रोजी 21 ते 26 वर्षे.
  • नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
  • फी : 500/- रुपये
  • फेलोशिप नियुक्ती कालावधी: 12 महिने
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 मार्च 2023
  • परीक्षा (Online): 04 & 05 मार्च 2023

♦ऑनलाईन अर्ज (Apply Online) :

♦ ऑनलाईन अर्ज मार्गदर्शक फाईल:

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची तपशीलवार माहिती http://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP या संकेतस्थळावर उपलब्ध असून काही शंका असल्यास [email protected] या ईमेल वर किंवा 8411960005 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री फेलोशिप , cmfellowship ,Chief Minister Fellowship,मुख्यमंत्री फेलोशिपसाठी ऑनलाईन अर्ज,Chief Minister Fellowship Apply online , Chief Minister Fellowship in marathi , Chief Minister Fellowship marathi information , Chief Minister Fellowship  online form , Chief Minister Fellowship Apply form, Mukhyamantri Fellowship Yojana Maharashtra , Mukhyamantri Fellowship Yojana in marathi , Mukhyamantri Fellowship Yojana Maharashtra marathi information , Mukhyamantri Fellowship Yojana Maharashtra marathi mahiti 

हे वाचा 👉 सकाळ इंडिया फाउंडेशन करिअर डेव्हलपमेंट शिष्यवृत्ती | Sakal India Foundation Career Development Scholarship

Check Also

Domestic Cow Rearing Subsidy Scheme of Maharashtra Govt

महाराष्ट्र सरकारची देशी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना: प्रति गाय प्रति दिन रु. 50/- अनुदान | Desi Gaay Palan Poshan Anudan Yojana

Desi Gaay Palan Poshan Anudan Yojana : महाराष्ट्र सरकारने देशी गायींच्या पालन पोषणासाठी एक महत्वाची …

Mothers name is mandatory on government documents

शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक -शासन निर्णय जारी : पहा संपूर्ण माहिती

Mother's name is mandatory on government documents : माणसाला जन्म देण्यापासून त्याला मोठे करून स्वतःच्या पायावर उभे करण्यात वडिलांच्या बरोबरीने आईचा. देखील तेवढाच वाटा असतो. {शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक} तिचं श्रेय तिला मिळावे यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.