विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाच्या कामकाजाला आज सुरुवात झाली. यावेळी भाजप नेते तथा राज्याचे वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर, तंत्रज्ञांच्याच्या भरतीसंदर्भात मोठी घोषणा केली. राज्यात लवकरच डॉक्टर, तंत्रज्ञांच्या 4,500 हजार जागांवर भरती करण्यात येणार असून ही भरती प्रक्रिया टीसीएसच्या (TCS) माध्यमातून पार पडणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हंटले.
राज्यात डॉक्टर, तंत्रज्ञांच्या 4,500 हजार जागांची भरती करणार
State Medical Minister Girish Mahajan made a big announcement regarding the recruitment of doctors, technicians. Minister Mahajan said that 4,500 thousand posts of doctors and technicians will be recruited in the state soon and this recruitment process will be done through TCS.
हे वाचा 👉 Aadhaar Voter ID linking : मतदान ओळखपत्र आधार कार्ड सोबत लिंक करा | घरबसल्या करा अगदी काही मिनिटातच
नागपूर येथे सुरू असलेल्या विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून या अधिवेशनात विविध मुद्यांवरून विरोधकांकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. यावेळी अधिवेशनाच्या सुरुवातीला मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर, तंत्रज्ञांच्या पदांच्या भरतीसंदर्भात माहिती देत घोषणा केली. यावेळी महाजन म्हणाले, आम्ही MPSC च्या माध्यमातून 300 डॉक्टर भरले आहेत. सध्या 28 टक्के पदे रिक्त आहेत. या संदर्भात आम्ही मेडिकल बोर्ड तयार करणार आहोत आणि त्या माध्यमातून लवकरच पदभरती करण्यात येईल. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
हे वाचा 👉 (SSC-HSC Board Exam) दहावी-बारावी परीक्षेत सवलतीच्या गुणांसाठी 50 रुपयांऐवजी आता 25 रुपये शुल्क; पहा संपूर्ण माहिती
एमपीएससी (MPSC) मार्फत जागा भरण्यास वेळ लागतो. आत्तापर्यंत 10 टक्के हॉस्पिटल आणि 90 टक्के हाफकिन अशी औषधे खरेदी होती, मात्र आता हे प्रमाण आम्ही बदलत आहोत. आता 30 टक्के हॉस्पिटल आणि 70 टक्के हाफकिन अशी औषधं खरेदी केली जाईल.
recruitment of doctors, technicians | डॉक्टर, तंत्रज्ञांच्या 4,500 हजार जागांची भरती | doctors and technicians
हे वाचा 👉 राज्य सरकार अंतर्गत शेळीपालन योजना (Sheli Palan Yojana) – ऑनलाईन अर्ज सुरु | पहा कशी आहे हि योजना