Breaking News

(SSC-HSC Board Exam) दहावी-बारावी परीक्षेत सवलतीच्या गुणांसाठी 50 रुपयांऐवजी आता 25 रुपये शुल्क; पहा संपूर्ण माहिती

SSC-HSC Board Exam: दहावी आणि बारावी बोर्डाच्या (SSC HSC Exams) परीक्षेत आता सवलतीच्या गुणांसाठी (Concession Marks) 50 रुपयांऐवजी 25 रुपये द्यावे लागणार आहेत. चालू वर्षापासून बोर्डाच्या परीक्षेत सवलतीच्या अतिरिक्त गुणांसाठी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्काव्यतीरिक्त अतिरिक्त 50 रुपये आकारले जाणार होते. पण त्यात आता 50 टक्के कपात केली आहे. विद्यार्थी (Students), पालक (Parents ) आणि शिक्षक संघटनांनी (Teachers Associations) या शुल्काला विरोध केला होता. 50 रुपये शुल्क विरोधात पालकांनी आणि शिक्षक संघटनांनी राज्य शिक्षण मंडळाकडे (State Board of Education) शुल्क कमी करण्याची मागणी केली होती. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता शुल्क 25 रुपये करण्यात (SSC HSC Exams) आले आहे. या ब्लॉग मध्ये खाली संपूर्ण माहिती दिली आहे पाहुया 
SSC-HSC Board Exam

SSC-HSC Board Exam

Which students get concession marks?

कोणत्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण ?

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या आणि लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या तसेच खेळाडू, एनसीसी, स्काऊट व गाईड विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्यात येतात. निकालाचा टक्का वाढवण्यास हातभार लावत असल्याने विद्यार्थ्यांसाठी हे गुण महत्त्वाचे असतात. त्यामुळे विद्यार्थी सवलतीच्या अतिरिक्त गुणांसाठी शाळा, शिक्षणाधिकारी किंवा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव दाखल करतात. परंतु सवलतीच्या अतिरिक्त गुणांचा लाभ घेण्यासाठी फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून प्रति विद्यार्थी 50 रुपये छाननी शुल्क हे शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडून प्रस्ताव सादर करत असताना चलनाद्वारे किंवा रोख रक्कम भरणा म्हणून विभागीय मंडळ स्तरावर घेण्यात येत होतं.

हे वाचा → पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश सुलभ होण्यासाठी शासन निर्णय जारी – GR PDF

Why the decision to charge Rs 50 scrutiny fee?

50 रुपये छाननी शुल्क आकारण्याचा निर्णय का ?

शिक्षणाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांमार्फत सवलतीच्या अतिरिक्त गुणांचे प्रस्ताव शाळा तसंच विभागीय शिक्षण मंडळाकडे येत असतात. या सर्व प्रस्तावांची छाननी करावी लागते. त्यानंतर त्यात काही त्रुटी आढळल्यास संबंधितांशी पत्रव्यवहार करुन त्रुटींची पूर्तता करावी लागते. त्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर रोजंदारी कर्मचारी नेमावे लागतात. या कामासाठी लागणारा वेळ, श्रम याचा विचार करुन 50 रुपये छाननी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं होतं.

हे वाचा → Aadhaar Voter ID linking : मतदान ओळखपत्र आधार कार्ड सोबत लिंक करा | घरबसल्या करा अगदी काही मिनिटातच

Now charges Rs 25 for discounted points

आता सवलतीच्या गुणांसाठी 25 रुपये शुल्क

परंतु राज्य शिक्षण मंडळाच्या या निर्णयानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी पाहायला मिळला होती. यासंदर्भात वेगवेगळ्या संघटनांकडून निवेदनं प्राप्त झाल्यानंतर त्यांचा विचार करुन आणि विद्यार्थी हीत लक्षात घेऊन सवलतीच्या गुणांसाठी प्रस्ताव सादर करत असताना, अर्ज करत असताना 50 रुपयांऐवजी आता प्रति विद्यार्थी 25 रुपये छाननी शुल्क म्हणून शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाने स्वीकारावं, अशाप्रकारच्या सूचना राज्य शिक्षण बोर्डाकडून देण्यात आल्या आहेत.

हे वाचा → वैद्यकीय शिक्षण मराठी भाषेतून होणार (Medical Education In Marathi) राज्य सरकारचा मोठा निर्णय

10th and 12th Board Exams

दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा

दरम्यान, यावर्षी बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2023 या कालावधीत होणार असून, दहावीची परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. 

SSC-HSC Board Exam in Maharashtra

SSC-HSC Board Exam Marathi Information
Check Also

Maharashtra ITI Admission Online 2024

आय टी आय प्रवेश प्रक्रिया 2024 | Maharashtra ITI Admission Online 2024 | admission.dvet.gov.in

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश - Maharashtra ITI Admission Online 2024 | ITI प्रवेश ऑनलाईन अर्ज | ITI Admission Online 2024 | आय टी आय प्रवेश प्रक्रिया | admission.dvet.gov.in

Maharashtra SSC 10th Result 2024

Maharashtra SSC 10th Result 2024 Live | महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर,असा करा चेक | इथे 2 मिनिटात मिळेल रिझल्ट

Maharashtra SSC 10th Result 2023 :  महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल 02 जून रोजी जाहीर होणार आहे.दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी ..या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल