Breaking News

(SSC and HSC board Exam Timetable ) दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर | पहा ‘या’ तारखेला पहिला पेपर

SSC and HSC board Exam Timetable 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारीत तर दहावीची लेखी परीक्षा मार्च महिन्यात सुरू होणार आहे. बोर्डाकडून अंतिम परीक्षेचं वेळापत्रक आज संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.

हे वाचा 👉  (SSC-HSC Board Exam) दहावी-बारावी परीक्षेत सवलतीच्या गुणांसाठी 50 रुपयांऐवजी आता 25 रुपये शुल्क; पहा संपूर्ण माहिती

SSC and HSC board Exam Timetable

SSC and HSC board Exam Timetable 2023

SSC and HSC board Exam Timetable | दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक 2023 | SSC and HSC board Exam Timetable 2023 |  SSC-HSC Exam Timetable | SSC Exam and HSC Exam Date Declered | CBSE Exam

राज्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 9 विभागीय मंडळाकडून दहावी, बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक याआधी सप्टेंबर महिन्यातच प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानतंर वेळापत्रकाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. यासाठी १५ दिवसांची मुदत दिली गेली होती. वेळापत्रकाबाबत आलेल्या सूचनांनंतर दहावी आणि बारावीचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

हे वाचा 👉  डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना | Dr. Panjabrao Deshmukh Sarthi Scholarship

SSC and HSC board Exam Timetable

हे वाचा 👉  प्रधानमंत्री कौशल विकास योजना – अशी करा नोंदणी | Pradhanmantri Kaushal Vikas Yojana

बारावीच्या लेखी परीक्षेची सुरुवात 21 फेब्रुवारीला होणार आहे. या परीक्षा 21 मार्चपर्यंत पार पडतील. तर दहावीची लेखी परीक्षा 2 मार्चला सुरू होऊन 25 मार्च पर्यंत होईल असं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षांचे दिनांकनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल.

त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी. अन्य कोणत्याही संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येईल, अशी सूचना राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रकटनाद्वारे दिली आहे.

येथे पाहा अंतिम वेळापत्रक – www.mahahsscboard.in 

हे वाचा 👉  Aadhaar Voter ID linking : मतदान ओळखपत्र आधार कार्ड सोबत लिंक करा | घरबसल्या करा अगदी काही मिनिटातच

CBSE Exam : सीबीएसईच्याही तारखा जाहीर 

दरम्यान, सीबीएसईच्या (CBSE Exam) दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा देखील जाहीर झाल्या आहेत. बोर्डाने काल परिपत्रक जाहीर करत ही माहिती दिली आहे. दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधी दरम्यान होणार आहेत. तर बारावीच्या परीक्षा या 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिलदरम्यान होतील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून cbse.gov.in या संकेतस्थळावर वेळापत्रक देखील देण्यात आलं आहे.

हे वाचा 👉 India Post Office Recruitment 2023 : नव्या वर्षात टपाल विभागात होणार 98 हजार जागांवर मेगा भरती | दहावी-बारावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

SSC and HSC board Exam Timetable,दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक 2023,SSC and HSC board Exam Timetable 2023,SSC-HSC Exam Timetable,SSC Exam and HSC Exam Date Declered,CBSE Exam

Check Also

Open, Backward Class Women do not need Non-Criminal Certificate

खुल्या व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही ! शासन निर्णय जारी | पहा संपूर्ण माहिती

खुल्या गटातील महिलांकरीता तसेच मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट शिथील करण्याचा निर्णय | Open, Backward Class Women do not need Non-Criminal Certificate

SBIF Asha Scholarship Program

SBI Foundation मार्फत विद्यार्थ्यांना 2 लाख रुपये पर्यंत शिष्यवृत्ती, लगेच अर्ज करा | SBI Asha Scholarship Program 2023

SBIF Asha Scholarship Program for Undergraduate Courses 2023 ,IIT Students 2023,IIM Students 2023,PhD Students 2023 . SBIF Asha Scholarship for PhD Students 2023