Breaking News

ऊस तोडणी यंत्र (हार्वेस्टर) खरेदीला मिळणार 35 लाखांचे शासनाकडून अनुदान जाहीर, लगेच अर्ज करा | Scheme for Sugarcane Harvesters

ऊस तोडणी यंत्र : राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी अनुदान देणेबाबतची योजना राबविण्यास राज्य शासनाने मंजूरी दिली असून ऊस तोडणी यंत्र खरेदीला ४० टक्के अथवा ३५ लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल इतक्या रकमेइतके अनुदान देण्यात येणार आहे. याबाबत संपूर्ण माहिती या लेखातून खाली दिलेली आहे . तरी संपूर्ण माहिती वाचावी हि विनंती . https://mahitivibhag.com/40-percent-or-35-lakh-rupees-subsidy-announced-by-the-government-for-the-purchase-of-sugarcane-harvesters-cutting-machine/ ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी मिळणार शासनाकडून अनुदान 

हे वाचा 👉 महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB /Day इंटरनेटसाठी ऑनलाइन अर्ज करा | Mahajyoti Yojana

ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी मिळणार शासनाकडून अनुदान

ऊस तोडणी यंत्रांना अनुदान योजना | Sugarcane Harvesters | Sugarcane Harvesters sarkari yojana | Subsidy Scheme for Sugarcane Harvesters | ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी मिळणार शासनाकडून अनुदान  | Subsidy Scheme for Sugarcane Cutting Machines | Maha-DBT portal online Apply  | महा-डीबीटी पोर्टल  | ऊस तोडणी यंत्रांना अनुदान योजना शासन निर्णय  |Subsidy Scheme for Sugarcane Cutting Machine Government GR  | ऊस तोडणी यंत्रांना अनुदान योजना मराठी माहिती  | ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना in मराठी  | Sugarcane Cutting Machine Subsidy Scheme in Marathi  | Sugarcane Cutting Machine Subsidy Yojana in Marathi | Scheme for Sugarcane Harvesters

आर्थिक वर्ष २०२२-२३ व २०२३-२४ मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी अनुदान देणेबाबतची योजना राबविण्यास शासन खालील अटींस अधिन राहून या शासन निर्णयाद्वारे मंजूरी देत आहे.

  • १) सदर योजनेअंतर्गत राज्यातील वैयक्तिक शेतकरी, उद्योजक (Entrepreneur), सहकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था (FPO) हे अनुदानास पात्र राहतील.
  • २) सदर योजना राज्यस्तरीय असून राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत (RKVY) आर्थिक वर्ष २०२२-२३ व २०२३-२४ मध्ये केंद्र शासनाने विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आलेल्या निधीमधून राबविण्यात येणार आहे.
  • ३) वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, सहकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था (FPO) यांना ऊस तोडणी यंत्र खरेदी किंमतीच्या (Tax Invoice नुसार) ४० टक्के अथवा रु.३५.०० लाख (अक्षरी रुपये पस्तीस लाख) यापैकी जी रक्कम कमी असेल इतक्या रकमेइतके अनुदान देय राहील. (जी.एस.टी. रक्कम वगळून)
  • ४) वैयक्तिक शेतकरी, उद्योजक यांचेबाबतीत एका कुटूंबातील एकाच व्यक्तीस एकाच ऊस तोडणी यंत्रासाठी तसेच शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था (FPO) यांचे बाबतीत एका संस्थेस एकाच ऊस तोडणी यंत्रासाठी संपूर्ण योजना कालावधीत अनुदान देय राहील.
  • ५) सदर योजनेमध्ये सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना प्रत्येकी जास्तीत जास्त ३ (तीन) ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान देय राहील.
  • ६) पात्र लाभार्थी यांनी यंत्र किंमतीच्या किमान २०% रक्कम स्वभांडवल म्हणून गुंतवणूक करणे आवश्यक आहे. उर्वरीत रक्कम ही कर्जरूपाने उभे करण्याची जबाबदारी पात्र लाभार्थ्यांची आहे.
  • ७) ऊसतोडणी यंत्र अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक कर्ज खात्यात PFMS प्रणालीद्वारे वर्ग करण्यात येईल.
  • ८) सदर योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रास खरेदी अनुदान मिळणेकरिता अर्जदारांनी शासन निर्णयाच्या अनुषंगाने परिपुर्ण प्रस्ताव कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
  • ९) ऊस तोडणी यंत्रास अनुदान देणेबाबतची योजना सदर शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून पुढे अंमलात येईल.
  • १०) ऊस तोडणी यंत्रासाठी यापूर्वी अनुदान प्राप्त झालेल्या लाभार्थ्यास या योजनेखाली पुन्हा लाभ घेता येणार नाही.
  • ११) केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या यंत्र उत्पादक कंपन्यांनी बनविलेल्या यंत्रांपैकी एका ऊसतोडणी यंत्राची निवड संबधित लाभार्थी यांनी करावी.
  • १२) ऊसतोडणी यंत्राचा वापर महाराष्ट्र राज्यामध्ये करणे बंधनकारक राहील.
  • १३) ऊसतोडणी यंत्रास काम मिळवण्याची जबाबदारी संबंधित लाभार्थ्याची राहील. ऊस तोडणी यंत्र पुरवठादार व खरेदीदार यांना आवश्यक ती विक्रीपश्चात सेवा, सुटेभाग पुरविणे इ. बाबत आवश्यक तो करार लाभार्थी व यंत्र पुरवठादार यांचे स्तरावर करावा.
  • १४) ऊस तोडणी यंत्र खरेदीदाराकडील मनुष्यबळ प्रशिक्षित करण्याची जबाबदारी यंत्र पुरवठादार यांची राहील व प्रशिक्षणाची खात्री करुनच खरेदीदाराने यंत्राची निवड करावी.
  • १५) अनुदान देण्यात आलेल्या ऊस तोडणी यंत्राची किमान ६ वर्ष विक्री/हस्तांतरण करता येणार नाही अन्यथा देण्यात आलेली अनुदान रक्कम वसुलीपात्र राहील व याबाबतचे बंधपत्र लाभार्थ्याने साखर आयुक्तालयास सादर करणे बंधनकारक राहील.
  • १६) केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थांकडून तपासणी झालेल्या ऊस तोडणी यंत्रांसाठीच अनुदान देण्यात येईल. ऊस तोडणी यंत्राची परिवहन विभागाकडे नोंदणी आवश्यक आहे व त्याबाबतची प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी संबंधित उत्पादक/ विक्रेता व लाभार्थी यांची असेल.
  • १७) ऊस तोडणी यंत्रावर लाभार्थीचे नाव, योजनेचे नाव, अनुदान वर्ष, अनुदान रक्कम इ. तपशील कायमस्वरूपी राहील अशा स्वरूपात नोंदविणे आवश्यक राहील. याबाबतची खातरजमा ऊस तोडणी यंत्र तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी तपासणी वेळी करावी. ऊस तोडणी यंत्र तपासणी करणारा अधिकारी सर्व मूळ कागदपत्रांची खात्री करून ऊस तोडणी यंत्रासोबत जिओ टॅगिंगच्या फोटोसह ऊस तोडणी यंत्राचा तपासणी अहवाल साखर आयुक्तालयास सादर करेल.
  • १८) लाभार्थीने त्यांस मंजूर झालेल्या ऊस तोडणी यंत्रासाठी महाडीबीटी पोर्टलवर अपलोड केलेल्या कोटेशन व टेस्ट रिपोर्ट प्रमाणेच ऊस तोडणी यंत्र खरेदी करणे आवश्यक राहील. तथापि अपवादात्मक परिस्थितीत त्याच प्रकारचे यंत्र अवजार लाभार्थी दुसऱ्या कंपनीचे खरेदी करू इच्छित असेल तर अशा बदलास सहसंचालक (विकास) यांची लेखी संमती आवश्यक राहील.
  • १९) महाडीबीटी प्रणालीवर निवड झालेल्या अनु. जाती व अनु. जमाती प्रवर्गाच्या लाभार्थ्यांना संबंधित योजनेचा लाभ घेण्यासाठी सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. कुटुंबातील इतर सदस्याचे जात प्रमाणपत्र ग्राह्य राहणार नाही.

हे वाचा 👉 आता Whatsapp वर मिळणार बँक अकाऊंटची सर्व माहिती | SBIनं ग्राहकांसाठी सुरू केली खास सुविधा | पहा संपूर्ण माहिती | SBI WhatsApp Banking Service

ऊस तोडणी यंत्रांना अनुदान योजना मार्गदर्शक सूचना

Guidelines for Subsidy Scheme for Sugarcane Harvesters

राज्यात सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता ४५० व सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता ४५० असे एकूण ९०० ऊस तोडणी यंत्रांचे लक्षांक साध्य करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. शासनाच्या महिला, अनु. जाती, व अनु. जमातीच्या लाभार्थ्यांकरीता प्रचलित असलेल्या धोरणानुसार ऊस तोडणी यंत्रांकरीता अनुदान देय राहील. राज्यासाठी निर्धारीत केलेल्या ऊस तोडणी यंत्रांच्या लक्षांकाच्या व अनुदानासाठी उपलब्ध होणाऱ्या निधीस तसेच ऊस तोडणी यंत्राच्या उपलब्धतेच्या अधिन राहूनच अर्जांना मंजूरी दिली जाईल व अनुदान वितरीत केले जाईल.

ऊस तोडणी यंत्रांना अनुदान योजना प्रशिक्षण

Subsidy scheme training for sugarcane harvesters

  • १. या योजनेची प्रभावीपणे अमंलबजावणी करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर साखर कारखान्याचे शेती अधिकारी, यंत्रधारक, यंत्रचालक यांचे प्रशिक्षण यंत्र उत्पादक कंपनीने आयोजित करावे. सदर प्रशिक्षणासाठी कृषि विज्ञान केंद्र, कृषि संशोधन केंद्र, कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ तसेच प्रशिक्षित अधिकारी / कर्मचारी यांचा सहभाग घेण्यात यावा.
  • २. सदरच्या प्रशिक्षणास साखर आयुक्तालयाच्या अधिनस्त विभाग स्तरावरील प्रादेशिक सहसंचालक (साखर) व त्यांचे कार्यालयातील अधिकारी यांना देखील सहभागी करून घेण्यात यावे.

हे वाचा 👉 शेतकऱ्यांना 15 लाख रुपये थेट बँक खात्यात, काय आहे योजना आणि कसा अर्ज करावा | पहा संपूर्ण माहिती | PM Kisan FPO Yojana

ऊस तोडणी यंत्रांना अनुदान योजनेची अंमलबजावणीची प्रक्रिया

Process of Implementation of Subsidy Scheme for Sugarcane Cutting Machines

इच्छुक अर्जदारांनी महा-डीबीटी पोर्टलद्वारे अर्ज करणे

Interested applicants to apply through Maha-DBT portal

  • कृषि विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसीत केली आहे. या प्रणालीद्वारे अर्जदारांना त्यांच्या पसंतीच्या ऊस तोडणी यंत्र निवडीचे स्वातंत्र्य देण्यांत आले आहे. या योजनेतंर्गत पात्र अर्जदारांची संगणकीय सोडत पध्दतीने निवड करण्यात येणार आहे. यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता व सुसूत्रता येऊन वरिष्ठ स्तरावरून योजनांच्या अंमलबजावणी प्रगतीचे प्रभावी सनियंत्रण करणे शक्य होणार आहे.

हे वाचा 👉  सरकारी नौकरीची दररोज नवीन माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा    

योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टीने महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे टप्पे

Steps to apply on MahaDBT portal for availing scheme

mahitivibhag

  • https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login
  • हे महा-डीबीटी पोर्टलचे संकेतस्थळ आहे.
  • या संकेतस्थळावरील सूचनांप्रमाणे अर्ज भरावा.
  • स्वतःचा मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतमधील संग्राम केंद्र यासारख्या माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्जदार अर्ज करू शकतील.

अर्जदार नोंदणी :

  • अर्जदारांनी प्रथमतः वापरकर्त्याचे नाव (User Name) व संकेत शब्द (Password) तयार करून नोंदणी पूर्ण करावी. त्यानंतर पुन्हा लॉग-इन करून त्यांचे प्रोफाईल तयार करावे. अर्जदारांना ऊस तोडणी यंत्रांना अनुदान या घटकासाठी “वैयक्तिक लाभार्थी/ उद्योजक” व “शेती सहकारी संस्था / शेतकरी उत्पादक संस्था/ साखर कारखाने” असे नोंदणी पर्याय उपलब्ध असतील. अर्जदारांनी पर्याय निवडल्यानंतर महा डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याबाबत सविस्तर माहिती युजर मॅन्युअलद्वारे पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच प्रत्येक घटकाने अर्ज कशा पद्धतीने करावा तसेच अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावीत याबाबतची सविस्तर माहिती पोर्टलवर देण्यात आली आहे.

अर्जदाराने वैयक्तिक तपशील भरणे :

  • “वैयक्तिक लाभार्थी/ उद्योजक” म्हणून नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना प्रथमतः त्यांचा वैयक्तिक तपशील भरणे बंधनकारक आहे. या सदरामध्ये तारांकित (*) बाबींची माहिती देणे अनिवार्य आहे. सदर माहिती भरल्यानंतरच लाभार्थ्यांना ऊस तोडणी यंत्र अनुदान या घटकासाठी अर्ज करता येईल.

अर्ज शुल्क :

  • ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करताना अर्जदारांना रक्कम रु.२०/- अधिक रक्कम रु.३.६० पैसे वस्तू व सेवाकर असे एकूण रक्कम रू.२३.६० पैसे अर्ज शुल्क म्हणून ऑनलाईन भरावयाचे आहे.
♦  अर्जाची नोंदणी झाल्यानंतर प्राप्त अर्जांतून लाभार्थ्याची निवड संगणकीय सोडत (Computerized Lottery) पद्धतीने केली जाईल व याबाबत लघुसंदेशाद्वारे (SMS) संबंधितास कागदपत्रे अपलोड करणाबाबत कळविण्यात येईल. नोंदणी करताना ७/१२ व ८अ उतारा, आधार कार्ड व आधार लिंक बँक पासबुकची प्रत पोर्टलवर अपलोड करावी.
♦ सहकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था (FPO) यांचे बाबतीत नोंदणी प्रमाणपत्र व संस्थेचे नावाचे बँक पासबुकची प्रत पोर्टलवर अपलोड करावी.

ऊस तोडणी यंत्रांना अनुदान योजना शासन निर्णय

Subsidy Scheme for Sugarcane Cutting Machine Government GR

mahitivibhag

ऊस तोडणी यंत्रांना अनुदान योजना ,Sugarcane Harvesters,Sugarcane Harvesters sarkari yojana , Subsidy Scheme for Sugarcane Harvesters,ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी मिळणार शासनाकडून अनुदान ,Subsidy Scheme for Sugarcane Cutting Machines,Maha-DBT portal online Apply ,महा-डीबीटी पोर्टल ,ऊस तोडणी यंत्रांना अनुदान योजना शासन निर्णय ,Subsidy Scheme for Sugarcane Cutting Machine Government GR , ऊस तोडणी यंत्रांना अनुदान योजना मराठी माहिती , ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना in मराठी , Sugarcane Cutting Machine Subsidy Scheme in Marathi , Sugarcane Cutting Machine Subsidy Yojana in Marathi , Scheme for Sugarcane Harvesters

हे वाचा 👉 राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या खात्यात वाढीव मानधन येणार ; शासन निर्णय जारी | Asha volunteers

Check Also

Domestic Cow Rearing Subsidy Scheme of Maharashtra Govt

महाराष्ट्र सरकारची देशी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना: प्रति गाय प्रति दिन रु. 50/- अनुदान | Desi Gaay Palan Poshan Anudan Yojana

Desi Gaay Palan Poshan Anudan Yojana : महाराष्ट्र सरकारने देशी गायींच्या पालन पोषणासाठी एक महत्वाची …

Mothers name is mandatory on government documents

शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक -शासन निर्णय जारी : पहा संपूर्ण माहिती

Mother's name is mandatory on government documents : माणसाला जन्म देण्यापासून त्याला मोठे करून स्वतःच्या पायावर उभे करण्यात वडिलांच्या बरोबरीने आईचा. देखील तेवढाच वाटा असतो. {शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक} तिचं श्रेय तिला मिळावे यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.