Breaking News

राज्यात 6 मेपासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरांचे आयोजन | Chhatrapati Shahu Maharaj Yuva Shakti Career Camp

विद्यार्थी, युवक-युवतींसाठी राज्यातील 36 जिल्ह्यांत जिल्हास्तरावर तसेच राज्यातील सर्व 288 मतदारसंघांत 6 मे ते 6 जून 2023 या कालावधीत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरांचे आयोजनChhatrapati Shahu Maharaj Yuva Shakti Career Camp” करण्यात आले आहे. कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. https://mahitivibhag.com/chhatrapati-shahu-maharaj-yuva-shakti-career-camp/

Chhatrapati Shahu Maharaj Yuva Shakti Career Camp

Chhatrapati Shahu Maharaj Yuva Shakti Career Camp

राज्यातील ग्रामीण, शहरी अशा सर्व भागातील विद्यार्थी, युवक-युवती व पालकांनी या शिबिरांमध्ये सहभागी व्हावे व बदलत्या काळास अनुसरुन ठिकठिकाणी सुरु झालेल्या विविध शैक्षणिक, व्यावसायिक इत्यादी अभ्यासक्रमांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन मंत्री श्री. लोढा यांनी केले.

हे वाचा 👉 प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ! १० लाखापर्यंत अनुदान – उद्योजक होण्याची सुवर्णसंधी

छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरांचे आयोजन

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये नियोजित ठिकाणी शिबिरांचे उद्घाटन जिल्ह्यांचे पालकमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. या करिअर शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थी, युवक-युवती व पालकांना विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळणार आहे. करियर शिबिराच्या ठिकाणी विविध स्टॉलच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रमांची तसेच इतर माहिती देण्यात येणार आहे. इयत्ता दहावीनंतर करिअर कसे निवडावे, दहावी नंतरच्या शिक्षणाच्या विविध संधी, बारावी नंतरच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा, व्यक्तिमत्व विकास यासोबतच इतर विविध विषयांबाबत मार्गदर्शन देण्यात येणार आहे. आयटीआय व्यवसाय अभ्यासक्रम, इंजीनियरिंग व तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक ) अभ्यासक्रम, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ व त्यातील विविध अभ्यासक्रम, शैक्षणिक कर्ज व शिष्यवृत्तीविषयक विविध योजना, रोजगार व स्वयंरोजगारविषयक विविध योजना, स्थानिक शैक्षणिक संस्था आदींविषयी या शिबिरांमधून सविस्तर मार्गदर्शन देण्यात येणार आहे. परदेशातील उच्च शिक्षणासंबंधीही मार्गदर्शन देण्यात येणार आहे.

हे वाचा 👉 महाराष्ट्रात ‘जत्रा शासकीय योजनांची’, प्रत्येक जिल्ह्यातील ७५ हजार जणांना थेट शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार महासंकल्प

Chhatrapati Shahu Maharaj Yuva Shakti Career Camp Registration

छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबीर QR कोड

या संधीचा लाभ घेण्यासाठी स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी (आयटीआय) संपर्क साधावा, तसेच सोबत जोडलेल्या क्यूआर कोड ( QR CODE ) च्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, युवक-युवतींनी नोंदणी करून शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन., व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगांबर दळवी यांनी केले आहे.

छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबीर नोंदणी

mahitivibhag

हे वाचा 👉 सरकारी नौकरीची दररोज नवीन माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  

Chhatrapati Shahu Maharaj Yuva Shakti Career Camp

हे वाचा 👉 (India Post) महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना | Mahila Samman Bachat Patra Yojana

हे वाचा 👉 मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनासाठी अर्ज करा | Apply for MSKVY Solar

Check Also

Open, Backward Class Women do not need Non-Criminal Certificate

खुल्या व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही ! शासन निर्णय जारी | पहा संपूर्ण माहिती

खुल्या गटातील महिलांकरीता तसेच मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट शिथील करण्याचा निर्णय | Open, Backward Class Women do not need Non-Criminal Certificate

SBIF Asha Scholarship Program

SBI Foundation मार्फत विद्यार्थ्यांना 2 लाख रुपये पर्यंत शिष्यवृत्ती, लगेच अर्ज करा | SBI Asha Scholarship Program 2023

SBIF Asha Scholarship Program for Undergraduate Courses 2023 ,IIT Students 2023,IIM Students 2023,PhD Students 2023 . SBIF Asha Scholarship for PhD Students 2023