Breaking News

(India Post) महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना | Mahila Samman Bachat Patra Yojana

MSSC : देशातील महिलांची आर्थिक उन्नती सुनिश्चित करण्यासाठी देशातील १.५९ लाख पोस्ट ऑफिसमध्ये “महिला सन्मान बचत पत्र” (Mahila Samman Bachat Patra) सुरू करण्यात येत आहे. वित्त मंत्रालयाने वर्ष 2023 साठीच्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्रासंबंधी {Mahila Samman Savings Certificates} राजपत्रित अधिसूचना जारी करून ती 1.59 लाख टपाल कार्यालयात [ India Post Office ] त्वरित प्रभावाने उपलब्ध करून दिली आहेत. https://mahitivibhag.com/mahila-samman-bachat-patra-yojana/

Mahila Samman Bachat Patra Yojana

Mahila Samman Bachat Patra Yojana

वित्त मंत्रालयाने वर्ष 2023 साठीच्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्रासंबंधी राजपत्रित अधिसूचना जारी करून ती 1.59 लाख टपाल कार्यालयात त्वरित प्रभावाने उपलब्ध करून दिली आहेत. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी वर्ष 2023-24 च्या अर्थसंकल्पात ‘आझादी का अमृत महोत्सव’ च्या स्मरणार्थ या योजनेची घोषणा केली होती. मुलींसह महिलांच्या आर्थिक समावेशन आणि सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

हे वाचा 👉 मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनासाठी अर्ज करा | Apply for MSKVY Solar

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना

दोन वर्षांच्या कालावधीची ही योजना गुंतवणुकीच्या विविध पर्यायांसह आणि दोन लाख रुपयांच्या कमाल मर्यादेसह तसेच आंशिक पैसे काढण्याच्या पर्यायांसह तिमाही चक्रवाढ पद्धतीने 7.5 टक्के दराने आकर्षक आणि निश्चित व्याज देते. ही योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत दोन वर्षांच्या कालावधीसाठी वैध आहे.

राष्ट्रीय बचत (मासिक उत्पन्न खाते) योजना, 2019 मध्ये राष्ट्रीय बचत (मासिक उत्पन्न खाते) (सुधारणा) योजना, 2023 द्वारे सुधारणा करण्यात आली आहे आणि एका खात्यासाठी कमाल गुंतवणूक मर्यादा चार लाख पन्नास हजार रुपयांवरून नऊ लाख रुपये एवढी करण्यात आली आहे आणि 1 एप्रिल 2023 पासून संयुक्त खात्यासाठी नऊ लाख रुपयांवरून 15 लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे त्याचप्रमाणे, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, 2019 मध्ये ज्येष्ठ नागरिक बचत (सुधारणा) योजना, 2023 द्वारे सुधारणा करण्यात आली आहे आणि गुंतवणूकीची कमाल मर्यादा आजपासून 15 लाख रुपयांवरून 30 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

हे वाचा 👉  प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ! १० लाखापर्यंत अनुदान – उद्योजक होण्याची सुवर्णसंधी

बचत ठेव आणि पीपीएफ अर्थात कर्मचारी भविष्य निधी (PPF) वगळता सर्व लहान बचत योजनांवरील व्याजदरांमध्ये 1 एप्रिल 2023 पासून सुधारणा करण्यात आली आहे. या उपायांमुळे टपाल खात्यामधल्या लहान बचत करणाऱ्या ग्राहकांना खूप फायदा होईल आणि टपाल कार्यालयाद्वारे या योजनांमध्ये अधिक गुंतवणूक आकर्षित करता येईल, विशेषतः ग्रामीण भागात आणि मुली, महिला, शेतकरी, कारागीर, ज्येष्ठ नागरिक, कारखानदार, सरकारी कर्मचारी, छोटे व्यापारी आणि समाजातील इतर घटक यांना लहान बचत योजनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल.

Mahila Samman Savings Certificates

हे वाचा 👉 जनरेशन गुगल स्कॉलरशिप मार्फत $2,500 अमेरिकन डॉलर्स शिष्यवृत्ती मिळणार – लगेच अर्ज करा | Generation Google Scholarship

Mahila Samman Savings Certificates

१ फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष योजना जाहीर केली होती ती महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना आहे. या योजनेवर ७.५% दराने व्याज मिळते.

महिला सन्मान बचत पत्र म्हणजे MSSC योजना २०२५ पर्यंत किंवा २ वर्षांसाठी असून या बचत योजनेत ७.५ टक्के व्याज दिला जाईल. महिला किंवा तुमच्या मुलीच्या नावाने महिला सन्मान बचत प्रमाणपत्रामध्ये कोणीही गुंतवणूक करू शकते.

MSSC – नफा किती होईल ?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादा २ लाख रुपये आहे. या योजनेत, गुंतवणूकदाराला ७.५% निश्चित व्याज दराने परतावा म्हणजे या योजनेत तुम्हाला एका वर्षात १५,४२७ रुपयांचा परतावा मिळेल. तर दोन वर्षांत ३२,०४४ रुपयांचा परतावा मिळेल. अशा प्रकारे, या योजनेतील तुमची दोन लाख रुपयांची गुंतवणूक दोन वर्षांत २.३२ लाख रुपये होईल.

तुम्ही या योजनेत गुंतवलेली आंशिक रक्कम काढू (विथड्रॉ) शकता. पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेत भौतिक MSCC पावती मिळवण्यासाठी तुम्हाला ४० रुपये तर तुम्ही ऑनलाइन पावती घेतली तर तुम्हाला ९ रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, १०० रुपये टर्नओव्हर पेमेंटसाठी ६.५ पैसे आकारले जातील.

हे वाचा 👉  एटीएम/पीओएस मशीनमध्ये तुमचा पिन टाकताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा गृह मंत्रालयाने दिला | Protect Your ATM Pin

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनाबाबत अधिक माहितीसाठी :

mahitivibhag

  • अधिक माहितीसाठी कृपया www.indiapost.gov.in या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्या.

हे वाचा 👉  सरकारी नौकरीची दररोज नवीन माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  

Mahila Samman Bachat Patra Yojana in marathi | Mahila Samman Bachat Patra Yojana marathi mahiti | Mahila Samman Bachat Patra Yojana marathi information | Mahila Samman Bachat Patra Yojana in information marathi | मराठीत महिला सन्मान बचत पत्र योजना  | महिला सन्मान बचत पत्र योजना मराठी महिती  | माहिती मराठीत महिला सन्मान बचत पत्र योजना  | Mahila Samman Savings Certificates in marathi | Mahila Samman Savings Certificates marathi mahiti | Mahila Samman Savings Certificates marathi information | Mahila Samman Savings Certificates in information marathi 

हे वाचा 👉 महाराष्ट्रात ‘जत्रा शासकीय योजनांची’, प्रत्येक जिल्ह्यातील ७५ हजार जणांना थेट शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार महासंकल्प

Check Also

Mothers name is mandatory on government documents

शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक -शासन निर्णय जारी : पहा संपूर्ण माहिती

Mother’s name is mandatory on government documents : माणसाला जन्म देण्यापासून त्याला मोठे करून स्वतःच्या …

Maharashtra Police Bharti 2024

Maharashtra Police Bharti 2024 | महाराष्ट्र पोलीस मध्ये 17531पदांची मेगा भरती प्रक्रिया 2024 (मुदतवाढ)

Maharashtra Police Bharti 2024 |महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अंतर्गत Police Constable, Police Bandsman, Police Constable-Driver, Police Constable-SRPF and Jail Constable Posts.