Breaking News

जननी सुरक्षा योजना (Janani Suraksha Yojana)अंतर्गत गर्भधारणा महिलांना आर्थिक सहाय्य देण्यात येते. कसे करायचे अर्ज? जाणून घ्या

Janani Suraksha Yojana : गर्भवती महिला आणि माता यांच्या आरोग्यदायी जीवनासाठी देशभरात अनेक योजना राबविल्या जात आहेत. देशातील ग्रामीण आणि शहरी भागात राहणाऱ्या दारिद्र रेषखालील कुटुंबामधील गर्भवती मातांना आर्थिक लाभ देण्यासाठी केंद्र शासनाने जननी सुरक्षा योजना (Janani Suraksha Yojana 2022) १२ एप्रिल, २००५ रोजी सुरु केली.

जननी सुरक्षा योजना महाराष्ट्र | जननी सुरक्षा योजना 2022 | जननी सुरक्षा योजना मराठी माहिती | जननी शिशु सुरक्षा योजना महाराष्ट्र | जननी सुरक्षा योजना कोणी सुरू केली | Janani Suraksha Yojana Benefits In Marathi | Janani Suraksha Yojana Marathi Information | Janani Suraksha Yojana Amount | Janani Suraksha Yojana Application Form | Janani Suraksha Yojana 2022 marathi | JSY In Marathi | Janani Suraksha Yojana in Maharashtra .





हे वाचा → Aadhaar Voter ID linking : मतदान ओळखपत्र आधार कार्ड सोबत लिंक करा | घरबसल्या करा अगदी काही मिनिटातच

Janani Suraksha Yojana Benefits In Marathi

Janani Suraksha Yojana

जननी सुरक्षा योजना

जननी सुरक्षा योजना उद्दिष्टे – Janani Suraksha Yojana Objectives

  • राज्‍यातील ग्रामीण व शहरी भागातील दारिद्रय रेषेखालील, अनुसूचित जाती व अनुसुचित जमातीच्‍या कुटुंबातील माता मृत्‍यु व अर्भक मृत्‍युचे प्रमाण कमी करणे आणि या महिलांचे आरोग्‍य संस्‍थेत प्रसुतीचे प्रमाणात वाढ करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

Janani Suraksha Yojana Implementation Procedure

जननी सुरक्षा योजना अंमलबजावणी प्रक्रिया




  • राज्‍यातील ग्रामीण व शहरी भागातील दारिद्रय रेषेखालील व अनुसुचित जाती व जमाती या कुटुंबातील सर्व गरोदर महिलांना शासकीय व खाजगी मानंकित आरोग्‍य संस्‍थेतील कोणत्‍याही बाळंतपणानंतर लाभ देय आहे तर फक्‍त दारिद्रयरेषेखालील गरोदर महिलेला घरी बाळंतपणानंतर लाभ देय आहे.
  • लाभार्थीकडून जननी सुरक्षा योजनेकरिता आवश्‍यक असलेली कागदपञे प्राप्‍त करुन घेणे.
  • विहीत नमुन्‍यातील जेएसवाय कार्ड सर्व आवश्यक माहिती भरुन लाभार्थीस देणे.
  • पाञ लाभार्थीस प्रसुतीपूर्व तीन तपासणी, धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण व लोहयुक्‍त गोळया मिळवून देणे अथवा त्‍या‍करिता मदत करणे.
  • पाञ जेएसवाय लाभार्थीस शासकीय आरोग्‍य संस्‍थ्‍ोत किंवा शासन मानांकित खाजगी आरोग्‍य संस्‍थेत प्रसुती करिता प्रवृत्‍त करणे.
  • पाञ जेएसवाय लाभार्थीस बॅंकेत खाते उघडून घेण्‍यासाठी मदत करणे

हे वाचा → कृषी यांत्रिकीकरण योजना 2022 -ऑनलाइन अर्ज सुरू | (Maha DBT) Krushi Yantrikikaran Yojana 2022

Benefits given to the beneficiaries under Janani Suraksha Yojana

जननी सुरक्षा योजना अंतर्गत लाभार्थ्यांना दिले जाणारे लाभ




  • ग्रामीण भागातील JSY पाञ लाभार्थी जर शासकीय आरोग्‍य संस्‍था / मानांकित खाजगी आरोग्‍य संस्‍थ्‍ोत प्रसुत झाली तर तिला प्रसुतीच्‍या तारखेनंतर ७ दिवसाच्‍या आत रुपये ७००/- लाभ बॅंक खात्‍यामध्‍ये परस्‍पर जमा होणा़-या धनादेशाव्‍दारे (Account Payee Crossed Cheque) दिला जातो.
  • शहरी भागातील JSY पाञ लाभार्थी जर शासकीय आरोग्‍य संस्‍था / मानांकित खाजगीआरोग्‍य संस्‍थ्‍ोत प्रसुत झाली तर तिला प्रसुतीच्‍या तारखेनंतर ७ दिवसाच्‍या आत रुपये ६००/-लाभ बॅंक खात्‍यामध्‍ये परस्‍पर जमा होणा़-या धनादेशाव्‍दारे (Account Payee Crossed Cheque) दिला जातो.
  • ग्रामीण व शहरी भागातील फक्‍त दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील लाभार्थ्‍यांची प्रसुती घरी झाल्‍यास अशा लाभार्थ्‍यांस रुपये ५००/- लाभ प्रसुतीच्‍या तारखेनंतर ७ दिवसाच्‍या आत बॅंक खात्‍यामध्‍ये परस्‍पर जमा होणा़या धनादेशाव्‍दारे (Account Payee Crossed Cheque) दिला जातो.
  • JSY पाञ लाभार्थीची सिझेरियन शस्‍ञक्रिया करणे आवश्‍यक असल्‍यास लाभार्थीस रुपये १५००/- लाभ बॅंक खात्‍यामध्‍ये परस्‍पर जमा होणा़या धनादेशाव्‍दारे (Account Payee Crossed Cheque) दिला जातो.

हे वाचा → (Maharashtra Talathi Bharti ) महाराष्ट्र राज्य तलाठी 4122 पदांची मेगा भरती 2023 (कोणत्या विभागात किती जागा ?? पाहा )

Benefits to ASHA workers under Janani Suraksha Yojana

जननी सुरक्षा योजना अंतर्गत आशा कार्यकर्तीस मिळणारे लाभ




  • ग्रामीण भागातील पाञ जेएसवाय लाभार्थीची प्रसुती शासकीय अथवा खाजगी मानंकित आरोग्‍य संस्‍थेत करण्‍यासाठी लाभार्थीस प्रवृत्‍त केल्‍यास एकूण रुपये ६००/- प्रती लाभार्थी आशा कार्यकर्तीस मानधन म्‍हणून अदा करण्‍यात येते. त्‍यामधील रुपये ३००/- प्रसूती पूर्व दयावयाच्‍या सेवा दिल्‍याची खाञी केल्‍यावर आणि रुपये ३००/- आरोग्‍य संस्‍थ्‍ेात प्रसुतीसाठी प्रवृत्‍त केल्‍याचे स्‍पष्‍ट झाल्‍यानंतर देण्‍यात येते.
  • शहरी भागात पाञ जेएसवाय लाभार्थीची प्रसुती आरोग्‍य संस्‍थेत करण्‍यासाठी लाभार्थीस प्रवृत्‍त केल्‍यास एकूण रुपये ४००/- प्रती लाभार्थी आशा कार्यकर्तीस मानधन म्‍हणून अदा करण्‍यात येते. त्‍यामधील रुपये २००/- प्रसूती पूर्व दयावयाच्‍या सेवा दिल्‍याची खाञी केल्‍यावर आणि रुपये २००/- आरोग्‍य संस्‍थ्‍ेात प्रसुतीसाठी प्रवृत्‍त केल्‍याचे स्‍पष्‍ट झाल्‍यानंतर देण्‍यात येते.

हे वाचा → (PM SVANidhi) पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज मिळणार | ऑनलाईन अर्ज सुरू

Health institutions providing services under Janani Suraksha Yojana

जननी सुरक्षा योजना अंतर्गत सेवा देणाऱ्या आरोग्य संस्था




  • ग्रामीण भागात – उपकेंद्रे, प्र‍ाथमिक आरोग्‍य केंद्रे, ग्रामीण रुग्‍णालये, उपजिल्‍हा रुग्‍णालये, जिल्‍हा स्‍ञी रुग्‍णालये, जिल्‍हा रुग्‍णालये, आणि जननी सुरक्षा योजनेकरिता मानांकित केलेली खाजगी रुग्‍णालये.
  • शहरी भागात – वैदयकीय महाविदयालये, नगरपालिका व महानगरपालिका यांच्‍या कार्यक्षेञतील नागरी आरोग्‍य केंद्रे, नागरी कुटुंब कल्‍याण केंद्रे व त्‍यांच्‍याकडील इतर रुग्‍णालये आणि शासन अनुदानित रुग्‍णालये.

जननी सुरक्षा योजना अधिक माहितीसाठी

Janani Suraksha Yojana Benefits In Marathi 




Check Also

Chhatrapati Shahu Maharaj Scholarship Scheme

Chhatrapati Shahu Maharaj Scholarship 2024 | परदेशात शिक्षणासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना 2024-लगेच अर्ज करा

Chhatrapati Shahu Maharaj Scholarship: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रतीवर्षी अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. {Rajshree Shahu Maharaj Scholarship Scheme}

Maharashtra ITI Admission Online 2024

आय टी आय प्रवेश प्रक्रिया 2024 | Maharashtra ITI Admission Online 2024 | admission.dvet.gov.in

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश - Maharashtra ITI Admission Online 2024 | ITI प्रवेश ऑनलाईन अर्ज | ITI Admission Online 2024 | आय टी आय प्रवेश प्रक्रिया | admission.dvet.gov.in