Breaking News

विहीर अनुदान योजना – विहिरींसाठी ४ लाख रुपये अनुदान | मागेल त्याला विहीर योजना

महात्मा गांधी राष्टीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचा निर्णय आपल्या सरकारने घेऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे.तर मित्रांनो विहिरींमधील अंतराची अट सुद्धा आता रद्द करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये शिथीतला करण्यात देण्यात आलेली आहे.दुसरा महत्वाचा निर्णय म्हणजेच ३ लाखांवरून ४ लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेले आहे.

Vihir Anudan Yojana

हे वाचा 👉 (Salokha Yojana) शेतजमिनीचे वाद मिटवण्यासाठीची ‘सलोखा योजना’सरकार राबवणार ; योजना नेमकी काय? काय होणार फायदे | GR पहा

Vihir Anudan Yojana maharashtra

नवीन महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विहिरी योजना | sinchan vihir yojana maharashtra new gr download | Sinchan Vihir Anudan Yojna | vihir yojana | सिंचन विहीर अनुदान योजना | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना | Vihir Anudan Yojana marathi information

नरेगा या योजनेतून विहिरींसाठी ४ लाख रुपये अनुदान हे या योजेनेंतर्गत आलेले आहे.शेतकरी मित्रांनो एका गावात किती विहिरी घेता येणार आहेत कोणत्या प्रकारच्या ग्रामपंचायत किंवा गावनिहाय मर्यादा विहीर वाटपासाठी ठेवण्यात आलेले नाही.

शेतकरी मित्रांनो एका गावातून ४० शेतकरी विहिरी अनुदानाचा लाभ घेऊ इच्छित असतील तर ते सर्व शेतकरी या ठिकाणी पात्र ठरवण्यात येणार आहेत.ग्रामीण भागात मंजुरांना रोजगार मिळावा आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

हे वाचा 👉  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना- अर्ज सुरु | कोण लाभ घेऊ शकतात ? पहा संपूर्ण माहिती

Vihir Anudan Yojana Govt Decision

विहीर अनुदान योजना शासन निर्णय

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींची कामे करतांना अधिनस्त कार्यालयास येत असलेल्या अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने सिंचन विहिरींसंदर्भात पुढील सुधारित मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.

Vihir Anudan Yojana Beneficiary Selection

विहीर अनुदान योजना लाभधारकाची निवड

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या परिशिष्ट १ कलम १ (४) मधील तरतुदीनुसार खालील प्रवर्गासाठी प्राधान्यक्रमाने सिंचन सुविधा म्हणून विहिरीची कामे अनुज्ञेय आहेत.

  • अनुसूचित जाती
  • अनुसूचित जमाती
  • भटक्या जमाती
  • निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती)
  • दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
  • स्त्री-कर्ता असलेली कुटुंबे
  • शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे
  • जमीन सुधारणांचे लाभार्थी
  • इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी
    इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियन २००६ (२००७ चा २) खालील लाभार्थी
  • सिमांत शेतकरी (२.५ एकर पर्यंत भूधारणा)
  • अल्प भूधारक (५ एकर पर्यंत भूधारणा)

हे वाचा 👉  madhmashi palan yojana : मधमाशी पालन योजना | ५० टक्के अनुदान मिळवा अर्ज सुरू

Vihir Anudan Yojana Beneficiary Eligibility

विहीर अनुदान योजना लाभधारकाची पात्रता

  • अ) लाभधारकाकडे किमान ०.४० हेक्टर क्षेत्र सलग असावे.
  • (ब ) महाराष्ट्र भुजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम १९९३ च्या कलम ३ नुसार अस्तित्वातील पेयजल खोताच्या ५०० मीटर परिसरात नवीन विहिर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे अस्तित्वातील पेयजल खोताच्या ५०० मीटर परिसरात सिंचन विहिर अनुज्ञेय करु नये,
  • (क) दोन सिंचन विहिरींमधील १५० मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही.
        (i) दोन सिंचन विहिरीमधील किमान १५० मीटर अंतराची अट ही Run off Zone तसेच, अनुसूचित जाती व जमाती व दारिद्रय रेषेखालील कुटुंब याकरिता लागू करण्यात येऊ नये.
        (ii) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून १५० मी. अंतराची अट लागू राहणार नाही.
  • (ङ) लाभधारकाच्या ७/१२ वर याआधीच विहीरीची नोंद असू नये.
  • (ई) लाभधारकाकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा. (Online)
  • (फ) एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र त्यांचे एकूण सलग जमीनीचे क्षेत्र ०.४० हेक्टर पेक्षा जास्त असावे.
  • (ग) ज्या लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कार्डधारक असला पाहिजे.

हे वाचा 👉  स्वस्त धान्य दुकान परवाना | नवीन स्वस्त धान्य दुकान सुरू करण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Vihir Anudan Yojana Application and Procedure

विहीरीसाठी अर्ज व त्यावरील कार्यपद्धती

इच्छुक लाभार्थ्यांने विहीत नमुन्यातील अर्ज (प्रपत्र अ- अर्जाचा नमूना व ब- संमती पत्र सोबत जोडलेले) ऑनलाईन किंवा ग्रामपंचायतीच्या “अर्ज पेटीत टाकावे. ऑनलाईन व्यवस्था तयार झाल्यावर लाभार्थ्यांने शक्य तोवर ऑनलाईन अर्ज करावा.

Documents to attach with Vihir Anudan Yojana Application

विहीर अनुदान योजनासाठी अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

  1. ७/१२ चा ऑनलाईन उतारा.
  2. ८ अ चा ऑनलाईन उतारा.
  3. जॉबकार्ड ची प्रत.
  4. सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून ०.४० हेक्टर पेक्षा अधिक सलग जमिन असल्याचा पंचनामा.
  5. सामुदायिक विहीर असल्यास समोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांमध्ये करारपत्र.

“अर्ज पेटी” दर सोमवारी उघडण्यात येऊन त्यातील अर्ज ऑनलाईन भरण्याचे कार्य ग्रामपंचायतीचे असेल. हे कार्य ग्रामपंचायत स्वतःचे डाटा एंट्री ऑपरेटर किंवा ग्राम रोजगार सेवक यांच्या मदतीने करेल. याप्रमाणे मनरेगाच्या सर्व मागण्या ऑनलाईन भरल्या जातील ही जबाबदारी त्या ग्रामपंचायतीसाठी जबाबदार असलेले तांत्रिक सहाय्यकाची राहील. वेळ प्रसंगी तांत्रिक सहाय्यकास सुद्धा ऑनलाईनसाठी डाटा एंट्री करावी लागली तरी त्यांनी ती करावी. वरील प्रमाणे प्राप्त झालेले सर्व अर्ज ग्रामपंचायतीस / ग्रामसेवकास ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले जातील.

हे वाचा 👉  राज्य सरकार अंतर्गत शेळीपालन योजना (Sheli Palan Yojana) – ऑनलाईन अर्ज सुरु | पहा कशी आहे हि योजना

सिंचन सुविधा म्हणून विहिरींना मंजूर करण्याबाबतच्या अटी

  • केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या दिनांक २४ ऑगस्ट २०१२ च्या कार्यसंदर्भातील सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार बोरवेल, ट्यूबवेल अनुज्ञेय नाही. तथापी शासन परिपत्रक क्रमांक मग्रारो२०११/प्र.क्र.११३ /रोहयो-१०अ दिनांक १७ ऑक्टोबर, २०११ अन्वये विंधन विहिर (In Well Bore) अनुज्ञेय आहे.
  • प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेमध्ये (PMKSY) दिलेल्या उद्दिष्टानुसार राज्यात ३,८७,५०० विहिरी घेण्यास भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार विहिर बांधण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत निहाय व तालुकानिहाय विहिरीसाठी लाभार्थ्यांची मागणी मान्य करण्यात यावी. तथापि, अद्ययावत भूजल मुल्यांकनानुसार यातील काही तालुके / गावामध्ये विहिरी घेण्यास बंदी आल्यास तशी बंदी अमलात येईल.
  • भूजल सर्वेक्षण यंत्रणा (GSDA) च्या व्याख्येप्रमाणे समीक्रिटीकल, क्रिटिकल, ओव्हर एक्स्प्लायटेड क्षेत्रामध्ये फक्त समूह विहिरी हाती घेता येवू शकतात. असा समूह तयार करतांना एकापेक्षा अधिक शेतकऱ्यांचा समूह असावा. समुहातील शेतकऱ्यांनी करारनामा करून उपलब्ध होणारे पाणी योग्य प्रमाणात वापरतील असे प्रमाणित करावे. असे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर ग्रामपंचायतीमार्फत अशी कामे हाती घेण्यात यावीत.
  • सुरक्षित क्षेत्रात (Sate Zone) वैयक्तिक लाभाची सिंचन विहिरींची कामे हाती घेता येवू शकतात
  • क्रिटिकल सेमी क्रिटिकल आणि ओव्हर एक्सप्लॉयटेड क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त जल पुनर्भरण संरचनांचे कार्य घेण्यात यावे. हे कार्य
    सुनियोजित पद्धतीने झाल्यास असे क्षेत्र सेफ झोनमध्ये परिवर्तित होतील. विविध झोन बाबत भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा दर तीन वर्षांनी पाहणी करते. विशिष्ट प्रयत्नातून एखादा झोन आधीच सेफ झोन मध्ये परिवर्तित झाले असे वाटत असल्यास त्याबाबत भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या निदर्शनास आणून तीन वर्षे पूर्ण होण्याआधीही यामध्ये स्पष्टता आणता येईल.

सुरक्षित पाणलोट क्षेत्रामध्ये विहिरीचे स्थळ निश्चिती करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे

या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संबंधित तांत्रिक सहाय्यकांनी विहीर स्थळ निश्चितीचे प्रमाणपत्र द्यावे. यासाठी सदर प्रमाणत्राव्यतिरिक्त इतर प्रमाणपत्राची आवश्यकता राहणार नाही.

अ) विहिर कोठे खोदावी :

  • दोन नाल्यांच्या मधिल क्षेत्रात व नाल्यांचे संगमाजवळ जेथे मातीचा किमान ३० से. मी. चा थर व किमान ५ मीटर खोलीपर्यंत नऊ (झिजलेला खडक आढळतो तेथे
  • नदी व नाल्या जवळील उथळ गाळाच्या प्रदेशात.
  • जमिनीच्या सखल भागात जेथे किमान ३० से. मी. पर्यंत मातीचा थर व किमान ५ मीटर खोली पर्यंत मुरुम (झिजलेला खडक) आढळतो.
  • नाल्याच्या तिरावर जेथे उंचवटा आहे तेथे, परंतु सदर उंचावर चोपण किंवा चिकण माती नसावी.
  • घनदाट व गर्द पानांच्या झाडांच्या प्रदेशात .
  • नदी व नाल्याचे जुने प्रवाह पात्र जेथे आता नदी पात्र नसतांना देखील वाळु, रेती व गारगोथर थर दिसून येते.
  • नदीचे / नाल्याचे गोलाकार वळणाच्या आतील भूभाग. अचानक दमट वाटणाऱ्या अथवा असणाऱ्या जागेत.

ब) विहीर कोठे खोदू नये : 

  • भूपृष्ठावर कडक खडक दिसणाऱ्या जागेत.
  • डोंगराचा कडा व आसपासचे १५० मीटरचे अंतरात.
  • मातीचा थर ३० से.मी. पेक्षा कमी असणाऱ्या भूभागात.
  • मुरमाची (झिजलेला खडक) खोली ५ मीटर पेक्षा कमी असणाऱ्या भूभागात. (मुरुमाची खोली सर्वसाधारणपणे अस्तित्वात असलेल्या जवळपासच्या विहिरीत डोकावले असता समजते. आसपास विहीर नसल्यास जवळच्या नदी/नाल्याच्या काठावरुन मुरुमाची खोलीचा अंदाज मिळू शकतो.)

क) विहीर खोदतांना खाली काळा खडक / पाषाण लागल्यास मशीन वापरुन पुढील खोदकाम करता येते. मात्र त्याने खर्च वाढतो. म्हणून पुढील खोदकाम न करता त्या विहिरीचे खोदकाम तेथेच बंद करुन पंचनामा करुन पुर्णत्वाचे दाखले द्यावे. तसेच, १४(क) मध्ये नमूद केल्याप्रमाणे अंदाजपत्रकात मंजूर केलेल्या खोली इतके काम करूनही एखाद्या विहिरीस पाणी लागले नसल्यास तसे नमूद करुन विहिर निष्फळ ठरविण्यात यावी. अशा दोन्ही प्रकारे अपयशी झालेल्या विहिरीत पावसाचे पुरेसे पाणी यावे या करिता, शेतात चर खोदकाम व फार्म वेडिंग करून पाण्याचा निचरा विहीरी समोरच्या recharge pit मध्ये सोडावा. अशाने संपूर्ण पावसाळ्यात एकदा जरी चांगला पाऊस पडला तरी ती विहीर भरून जाईल. तसेच, गरज असल्यास विहिरीच्या खालच्या बाजूला भूमिगत बंधारा बांधावे जेणेकरुन या विहरीत साचलेले पावसाचे पाणी ३-४ महिने टिकून राहील. त्याचा उपसा करुन संबंधित शेतकऱ्याने संरक्षित सिंचन करावे व आपल्या पिकाची उत्पादकता वाढवून आपले उत्पन्न वाढवावे.

हे वाचा 👉  रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी वर्षभर मोफत रेशन धान्य (Free Ration) मिळणार | केंद्र सरकारचा मोठा निर्णय

विहीर अनुदान योजनासाठी खाली क्लीक करून अर्ज फॉर्म, कागदपत्रे पात्रता पहा

मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर अनुदान योजना नमुना अर्ज: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- महाराष्ट्र अंतर्गत सिंचन सुविधा म्हणून वैयक्तिक लाभाची सिंचन विहीर मंजूर करणेसाठी नमुना अर्ज पाहण्यासाठी

शासन निर्णय डाउनलोड – येथे क्लिक करा 

● सिंचन विहीर अर्ज डाउनलोड – येथे क्लिक करा  

नवीन महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विहिरी योजना

विहीर अनुदान योजना

हे वाचा 👉 Aadhaar Voter ID linking : मतदान ओळखपत्र आधार कार्ड सोबत लिंक करा | घरबसल्या करा अगदी काही मिनिटातच

Check Also

Domestic Cow Rearing Subsidy Scheme of Maharashtra Govt

महाराष्ट्र सरकारची देशी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना: प्रति गाय प्रति दिन रु. 50/- अनुदान | Desi Gaay Palan Poshan Anudan Yojana

Desi Gaay Palan Poshan Anudan Yojana : महाराष्ट्र सरकारने देशी गायींच्या पालन पोषणासाठी एक महत्वाची …

Mothers name is mandatory on government documents

शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक -शासन निर्णय जारी : पहा संपूर्ण माहिती

Mother's name is mandatory on government documents : माणसाला जन्म देण्यापासून त्याला मोठे करून स्वतःच्या पायावर उभे करण्यात वडिलांच्या बरोबरीने आईचा. देखील तेवढाच वाटा असतो. {शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक} तिचं श्रेय तिला मिळावे यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.