Breaking News

लम्पी आजारामुळे मृत पावलेल्या जनावरांच्या पशुपालकांना आर्थिक मदत | ऑनलाईन अर्ज करा

lumpy disease : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रात लम्पी आजारामुळे शेतकऱ्यांचं  मोठं नुकसान झालंय. एकीकडे जनावरं आजारी पडून दगावत आहेत. तर दुसरीकडे त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर जनावरं दगावल्याने आर्थिक संकट ओढवलंय. अशातच आता राज्य सरकारनं  शेतकऱ्यांना दिलासादायक निर्णय घेतला आहे. लम्पी आजारामुळे दगावलेल्या जनावरांच्या मालकाला आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

हे वाचा 👉 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना- अर्ज सुरु | कोण लाभ घेऊ शकतात ? पहा संपूर्ण माहिती

लम्पी आजारामुळे मृत पावलेल्या जनावरांच्या पशुपालकांना आर्थिक मदत

 

लम्पी आजारामुळे मृत पावलेल्या जनावरांच्या पशुपालकांना आर्थिक मदत

Financial assistance to owners of animals dying of lumpy disease

जनावराचा लम्पी आजारामुळे मृत्यू झाल्यानंतर नजीकच्या पशु वैद्यकीय दवाखान्यातून पंचनामा करून घेणे बंधनकारक आहे. जनावराचा लम्पी आजारामुळे मुळे मृत्यू झाल्यानंतर लाभार्थीने तात्काळ नजीकच्या दवाखान्यात माहिती द्यावी अथवा ऑनलाईन भरपाई अर्ज सबमिट करणे बंधनकारक राहील. ज्या व्यक्तीच्या नावे नुकसान भरपाई अर्ज कराल त्याच व्यक्तीचे बँक खात्याचे तपशील द्यावे अन्यथा नुकसान भरपाई मिळणार नाही.

हे वाचा 👉 madhmashi palan yojana : मधमाशी पालन योजना | ५० टक्के अनुदान मिळवा अर्ज सुरू

मृत पशुधनासाठी शेतकरी, पशुपालकांना आर्थिक मदत

दुधाळ गायीचा मृत्यू झालेला असल्यास मालकाला 30 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. लम्पी आजारामुळे बैलाचा मृत्यू झाल्यास 25 हजार रुपयांचं आर्थिक साहाय्य करण्यात येणार आहे. तर वासराचा मृत्यू झाल्या 16 हजार रुपयांची मदत संबंधित मालकाला मिळणार आहे.

अ.क्र.मृत पावलेल्या पशुधनाचा प्रकार अर्थसहाय्याची अधिकतम मर्यादा रक्कम (प्रति जनावर)
1दुधाळ जनावरे (गाय)रु. 30,000/-
2ओढकाम करणारी जनावरे (बैल) रु. 25,000/-
3वासरे रु. 16,000/-

हे वाचा 👉 रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी वर्षभर मोफत रेशन धान्य (Free Ration) मिळणार | केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Apply online for compensation if animal dies due to lumpy

जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू झाला तर नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज करा

  • जनावरांचा लम्पी मुळे मृत्यू झाला तर नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील पोर्टल ओपन करा.
  • टॉप बार मध्ये अर्जदार नोंदणी या मेनू वर क्लिक करून अर्जदार आवश्यक माहती भरून नोंदणी करू शकतो.
  • नोंदणी केल्यानंतर टॉप बार मध्ये भरपाईसाठी अर्ज करा या मेनू वर क्लिक करा.
  • अर्जदार आधार क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा
  • नंतर आवश्यक माहती भरून अर्ज सादर करा.
  • जर अर्जदार आपला पासवर्ड विसरला तर पासवर्ड विसरला या वर क्लिक करून आधार क्रमांक आणि मोबाइल नंबर भरून पासवर्ड बदलू शकतो.

हे वाचा 👉 राज्य सरकार अंतर्गत शेळीपालन योजना (Sheli Palan Yojana) – ऑनलाईन अर्ज सुरु | पहा कशी आहे हि योजना

केलेला अर्ज माहिती कशी पाहावी ? / अर्जाची प्रत कशी काढावी ?

  • टॉप बार मध्ये केलेले अर्ज या मेनू वर क्लिक करा,
  • नंतर अर्जदार आधार क्रमांक आणि पासवर्ड नि लॉगिन करा.
  • अर्जदार नि ज्या नुकसान भरपाई साठी अर्ज केला आहे त्या अर्जा ची प्रत काढण्यासाठी प्रत काढा वर क्लिक करा.

अधिक माहिती साठी शासन पाहावा

अधिकृत वेबसाईट – www.mhpashuaarogya.com

संपर्क: तांत्रिक अडचणी संदर्भात खालील ई-मेल / मोबाईल वर संपर्क करा.

  • कॉल सेंटर संपर्क (10AM to 6PM)
    1962

     

  • टोल फ्री संपर्क (8AM to 8PM)
    18002330418

Apply online for compensation if animal dies due to lumpy , Financial assistance to owners of animals dying of lumpy disease

हे वाचा 👉 Aadhaar Voter ID linking : मतदान ओळखपत्र आधार कार्ड सोबत लिंक करा | घरबसल्या करा अगदी काही मिनिटातच

Check Also

Open, Backward Class Women do not need Non-Criminal Certificate

खुल्या व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही ! शासन निर्णय जारी | पहा संपूर्ण माहिती

खुल्या गटातील महिलांकरीता तसेच मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट शिथील करण्याचा निर्णय | Open, Backward Class Women do not need Non-Criminal Certificate

SBIF Asha Scholarship Program

SBI Foundation मार्फत विद्यार्थ्यांना 2 लाख रुपये पर्यंत शिष्यवृत्ती, लगेच अर्ज करा | SBI Asha Scholarship Program 2023

SBIF Asha Scholarship Program for Undergraduate Courses 2023 ,IIT Students 2023,IIM Students 2023,PhD Students 2023 . SBIF Asha Scholarship for PhD Students 2023