Maharashtra Budget 2023 : महाराष्ट्रातील शेतकर्यांना आता वार्षिक १२ हजारांचा सन्माननिधी मिळणार : गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काहीतरी भरीव तरतुद केली जाईल अशी अपेक्षा होती. या अर्थसंकल्पातून राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यात नमो सरकारी शेतकरी योजना जाहीर करण्यात आली आहे.
Maharashtra Budget 2023
MAHA BUDGET 2023 | Maharashtra Budget 2023 | Maharashtra Budget| नमो शेतकरी महासन्मान निधी योजना | महासन्मान निधी योजना | maharashtra farmers |Sarkari Yojana | Mharashtra Yojana | Maha Yojana | Farmers Yojana | Farmers scheme | namo shetkari mahasanman
महाराष्ट्राचा सन 2023-24 साठीचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री देवेंद्र फडवणीस विधानसभेत सादर करत आहेत. वाढती महागाई, राज्यावरील कर्ज, तसेच कोरोना काळात ठप्प झालेले उद्योगधंदे, बेरोजगारी अशा अनेक समस्या आहेत. मात्र राज्याच्या विकासासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात कशा तरतुदी केल्या जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतीवर येत असलेली नैसर्गिक संकटे, मानवनिर्मित संकटे, सरकारची धोरणे यामुळे देखील शेती व्यवसाय सध्या संकटात सापडला आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात बळीराजासाठी कोणत्या ठोस योजना सरकार घेऊन येणार याकडे शेतकऱ्यांच्या लक्ष लागून राहिले आहे. त्या दृष्टीने सरकारने विमा योजनेसंबंधी मोठा निर्णय जाहीर केला आहे.
महाराष्ट्रातील शेतकर्यांना आता वार्षिक १२ हजारांचा सन्माननिधी मिळणार
शेतकरी अनेक संकटाना तोंड देत आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांना दिलासा देण्यासाठी नमो शेतकरी या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नमो शेतकरी योजना जाहीर करतो. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. त्यामध्ये राज्य सरकार आणखी 6 हजार रुपये देणार आहे. आता शेतकऱ्यांना वर्षाकाठी एकूण बारा हजार रुपये मिळणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्री देवेंद्र फडवणीस विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. फडवणीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना शेतकरी, शेतीसंबंधी मोठी घोषणा आज अर्थसंकल्पात केली आहे. आता 2016 च्या पंतप्रधान विमा योजनेत असलेल्या शेतकऱ्यांच्या विम्याचा हप्ता राज्य सरकार भरणार आहे. शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरुन पोर्टलवर नोंदणी करावी लागेल, असे फडवणवीस म्हणाले. यासाठी वर्षाकाठी3 हजार कोटी रुपयांची तरतुद या अर्थसंकल्पात केली आहे.
यापूर्वी विमा योजनेमध्ये विमा हप्त्याच्या 2 टक्के इतकी रक्कम शेतकऱ्यांकडून घेतली जात होती. मात्र आता राज्य सरकारने केलेल्या या घोषणेमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडणार नाही. विमा हप्ता राज्य सरकारच भरणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचे काम या अर्थसंकल्पातून केले आहे. शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीकविमा देण्यात येणार आहे.
शेतकर्यांना आता केवळ १ रुपयांत पीकविमा
- आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकर्यांकडून
- आता शेतकर्यांवर कोणताच भार नाही. राज्य सरकार भरणार हप्ता
- शेतकर्यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा
- 3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार
शेतकर्यांना आता केवळ १ रुपयांत पीकविमा…#MahaBudget2023 pic.twitter.com/23K3tutZBH
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 9, 2023
केंद्र सरकारने अमृतकाल बजेट सादर केल्यानंतर अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित असल्याचं अर्थमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा आणि पर्यावरणपूरक विकास या ‘पंचामृतावर’ आजचं बजेट असल्याचं अर्थमंत्री फडणवीसांनी सांगितलं. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस पाडला.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
- प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर
- प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार
- केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार
- 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ
- 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना…#MahaBudget2023 pic.twitter.com/zvcwrujj8r
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 9, 2023
MAHA BUDGET 2023,Maharashtra Budget 2023 ,Maharashtra Budget ,नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ,महासन्मान निधी योजना ,maharashtra farmers , Sarkari Yojana , Mharashtra Yojana , Maha Yojana , Farmers Yojana , Farmers scheme ,namo shetkari mahasanman
हे वाचा 👉 सरकारी नौकरीची दररोज नवीन माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा