Breaking News

इयत्ता १० वी व १२ वीच्या परिक्षेत प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस योजना

Maharashtra Student scholarship : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा {Student scholarship} सर्वांगीण विकास व्हावा व त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळून गुणवत्तेबाबत विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी राज्यातील (class 10th and 12th) इयत्ता १० वी व १२ वी मधील शालांत व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेत विशेष गुणांसह प्राविण्य मिळविणान्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस योजना (Incentive Prize Scheme for Students) लागू करण्यात आली आहे. https://mahitivibhag.com/incentive-prize-scheme-for-class-10th-and-12th-students/

Student scholarship

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस योजना

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळून गुणवत्तेबाबत विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी राज्यातील इयत्ता १० वी व १२ वी मधील शालांत व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेत विशेष गुणांसह प्राविण्य मिळविणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस योजना विभागाच्या संदर्भ क्र.१ येथील दिनांक १४/०८/२००३ रोजीच्या शासन निर्णयान्वये सुरू करण्यात आली आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीमध्ये संदर्भ क्र.२ व ३ येथील शासन निर्णयान्वये सुधारणा करण्यात आली आहे. सदर योजना राबविताना अडचणी येत असल्याचे आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी संदर्भ क्र.४ येथील पत्रान्वये कळविले आहे. त्यामुळे सदर योजनेबाबत सर्वसमावेशक सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

हे वाचा –  (Maharashtra Talathi Bharti ) महाराष्ट्र राज्य तलाठी 4644 पदांची मेगा भरती 2023

शासन निर्णय :

आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, नामांकीत शाळा, सैनिकी शाळा, एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमधील इयत्ता १० वी व १२ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (S.S.C. Board) तसेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (C.B.S.E. Board) मधून गुणवत्ता यादीत प्राविण्यासह गुण मिळवून राज्यात प्रथम येणाऱ्या ५ मुले व ५ मुली तसेच राज्यातील ९ विभागीय शिक्षण मंडळामध्ये प्रत्येक शिक्षण मंडळात प्रथम येणाऱ्या ३ मुले व ३ मुलींना प्रोत्साहनपर बक्षिस योजना राबविण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

हे वाचा – (India Post) महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना | Mahila Samman Bachat Patra Yojana

♦ शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, सैनिकी शाळा, नामांकीत शाळांमध्ये शिकत असलेले इयत्ता १० वी व १२ वीच्या परिक्षांमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (S.S.C. Board) मध्ये राज्यस्तरावर प्रावीण्य मिळविणारे मुले व मुली.

विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस योजना

इयत्ता १० वी व १२ वी मधील मुले व मुली यांच्या एका गटासाठी येणारा खर्च (S.S.C. Board)

Student scholarship

इयत्ता १० वी व १२ वी मधील मुले व मुली या ८ गटांसाठी येणारा एकूण खर्च ₹८,००,००० इतका खर्च अपेक्षित आहे. (S.S.C. Board )

♦ नामांकीत शाळा व एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल मधून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ ( C.B.S.E.) मध्ये राज्यस्तरावर प्रावीण्य मिळविणारे मुले व मुली.

CBSE Student scholarship

इयत्ता १० वी व १२ वी मधील मुले व मुली यांच्या एका गटासाठी येणारा खर्च (C.B.S.E.Board)

CBSE Board Student scholarship

इयत्ता १० वी व १२ वी मधील मुले व मुली या ८ गटांसाठी येणारा एकूण ₹ ८,००,००० इतका खर्च अपेक्षित आहे. (C.B.S.E.. Board)

♦राज्यस्तरावर प्रावीण्य अनुदान :-

उक्त परिच्छेद २ व ३ मधील एकूण १६ गटांतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी ₹ १,००० याप्रमाणे १० महिन्यांकरिता ८० (८X५=४० + ८X५=४०) लाभार्थी विचारात घेता, ₹ १,००० X १० महिने X ८० लाभार्थी = ₹८,००,०००/- असे एकूण S.S.C. BoardC.B.S.E. Board येथून राज्यस्तरावर प्रावीण्य मिळविणारे एकूण ८० विद्यार्थ्यांकरिता एकूण ₹८,००,००० इतका खर्च अपेक्षित आहे.

महाराष्ट्र राज्यात ९ विभागीय मंडळे असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (S.S.C. Board) येथून प्राविण्य मिळविणाऱ्या एका विभागीय मंडळातील इयत्ता १० वी व १२ वी मधील मुले व मुली.

SSC Board Student scholarship

इयत्ता १० वी व १२ वी मधील मुले व मुली यांच्या एका गटासाठी येणारा खर्च (S.S.C. Board)

SSC Board Student scholarship

इयत्ता १० वी व १२ वी मधील मुले व मुली या ८ गटांसाठी येणारा एकूण खर्च ₹ ४,००,००० इतका खर्च अपेक्षित आहे. ( S.S.C. Board)

♦ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ ( C.B.S.E. Board) यांची विभागीय मंडळे नसल्याने ते वगळून उक्त परिच्छेद ५ मधील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (S.S.C. Board) येथील एका विभागीय मंडळातील १० वी व १२ वी (कला, वाणिज्य व विज्ञान शाखा) मधील ८ गटांकरिता येणारा खर्च = ५०,००० X ८ ₹४,००,००० इतका खर्च अपेक्षित असून महाराष्ट्र = राज्यातील ९ विभागीय मंडळांकरिता येणारा खर्च = ₹४,००,००० x ९ = ₹३६,००,००० इतका खर्च अपेक्षित आहे.

विभागीय मंडळे प्रावीण्य अनुदानासाठी तरतूद –

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ ( C.B.S.E. Board) यांची विभागीय मंडळे नसल्याने ते वगळून एका विभागीय मंडळातील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ( S.S.C. Board) मधील २४ विद्यार्थ्यांना बक्षिस देण्यात येणार असून ९ विभागीय मंडळात एकूण लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या २४ X ९ = २१६ इतकी असून त्यांना प्रतिमाह ₹१००० याप्रमाणे x १० महीन्याकरिता ₹२१,६०,००० इतका खर्च अपेक्षित आहे.

सदर योजनेसाठी एकूण ₹ १,००,००,००० (रुपये एक कोटी मात्र) इतका अंदाजित वार्षिक खर्च अपेक्षित असून प्रस्तुत योजनेसाठी येणारा खर्च मागणी क्रमांक टी-४, २२२५-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना, जनजाती क्षेत्र उपयोजना, ०२-अनुसूचित जमातींचे कल्याण, २७७-शिक्षण, (१२) १० वी व १२ वी मधील शालांत परिक्षेत विशेष गुणांसह प्राविण्य मिळविणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस योजना (१२) (०१) राज्य योजनांतर्गत योजना (२२२५-३४१-१) या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

सन २०१९-२० व २०२०-२१ या कालावधीत कोविड-१९ च्या प्रादुर्भाव असल्याने या दोन वर्षासाठी सदर योजना न राबविता सन २०२२-२३ पासून राबविण्यात यावी.

एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना समान गुण असतील तर सर्वांना त्या क्रमांकाच्या बक्षिसाची रक्कम देण्यात यावी.

इयत्ता १० वी व १२ वी मधील शालांत व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेत विशेष गुणांसह प्राविण्य मिळविणान्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस योजना 

आदिवासी विकास विभाग शासन निर्णय – 

Maharashtra Student scholarship : इयत्ता १० वी व १२ वीच्या परिक्षेत प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस योजना |incentive prize scheme for class 10th and 12th students

हे वाचा –  मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनासाठी अर्ज करा | Apply for MSKVY Solar

हे वाचा –  प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ! १० लाखापर्यंत अनुदान – उद्योजक होण्याची सुवर्णसंधी

Check Also

Chhatrapati Shahu Maharaj Scholarship Scheme

Chhatrapati Shahu Maharaj Scholarship 2024 | परदेशात शिक्षणासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना 2024-लगेच अर्ज करा

Chhatrapati Shahu Maharaj Scholarship: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रतीवर्षी अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. {Rajshree Shahu Maharaj Scholarship Scheme}

Maharashtra ITI Admission Online 2024

आय टी आय प्रवेश प्रक्रिया 2024 | Maharashtra ITI Admission Online 2024 | admission.dvet.gov.in

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश - Maharashtra ITI Admission Online 2024 | ITI प्रवेश ऑनलाईन अर्ज | ITI Admission Online 2024 | आय टी आय प्रवेश प्रक्रिया | admission.dvet.gov.in